लोकसंचालित साधन केंद्र वाशिम याची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा
साप्ताहिक सागर आदित्य
लोकसंचालित साधन केंद्र वाशिम याची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा
विठ्ठल वाडी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सर्वसाधार सभेमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे मान्यवरांनी पूजन करून दीपप्रज्वलन केले. त्यानंतर केंद्र अध्यक्ष श्रीमती सविता सुनील चौधरी यांनी वर्ष 2025-26 चा आढावा व 2026-2027 चे नियोजन सादर केले. सदर सर्वसाधार सभेमध्ये . जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महिलांना सर्वांनी उद्याजिका व्हावे तसेच सत्ता, संपत्ती आणि समान संधी हे माविमचे ब्रीद वाक्य आहे त्याप्रमाणे महिलाना न्याय मिळन्या करिता महिलांनी पुढाकार घेण्याचे सांगितले. शंकर कोकडवार सर जिल्हा प्रबंधक नाबार्ड वाशिम यांना आपल्या भाषनामध्ये महिलांनी माविम च्या साह्याने विविध योजना घेऊन आपले छोटे मोठे उद्योग उभारावेत, तसेच तयार केलेल्या मालाला चांगली पॅकेजिंग, लेबलिंग ब्रॅण्डिंग करून विक्री करण्यास सांगितले. Pamfme योजनेचे मुठाळ सर योजने बद्दल माहिती दिली. जास्तीत जास्त महिलांनी सदर योजमध्ये 35% सबसिडी असून महिलांनी योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा प्रबंधक सर यांनी त्यांच्या भाषांमध्ये सांगितले की CMRC आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या MOU च्या मधातून महिलांना कर्ज वितरित करणार असे आश्वासन दिले. पोकरा योजने ची माहिती सोहम बेलोकर सर यांनी pokara 2.0 मार्फत असलेल्या गावासाठी वेगवेगळ्या योजना ज्यामधे 60% सबसिडी आहे त्याचा महिला बचत गटांच्या लाभ घेण्याचे आव्हान केले. सदर सर्वसाधार सभेमध्ये उत्कृष्ट उद्योजिका यांचा सत्कार करण्यात आला, उत्कृष्ट CRP आणि गाव विकास समिती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संकेत महाजन सर लेखाधिकारी माविम वाशिम, वैभव काळमेघ सर, राहुल मोकळे सर, प्रमोद गोरे सर , साधना मुळे मॅडम उपस्थित होते. सदर सर्वसाधार सभा यशस्वी पार पडण्या करिता केंद्र व्यवस्थापक, लेखापाल, उपजिविका सल्लागार, सहयोगीनी, CRP तसेच Fpo व्यवस्थापक आणि लेखापाल यांनी प्रयत्न केले.
0 Response to "लोकसंचालित साधन केंद्र वाशिम याची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा "
Post a Comment