दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हजारो वारकरी माऊलींना चहा, बिस्किटे, पिण्याचे स्वच्छ पाणी व इतर आवश्यक सेवा पुरविण्याचा संकल्प
साप्ताहिक सागर आदित्य ठाकरेंच्या
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सेवेसाठी एक नम्र पण मनापासूनचे आवाहन
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हजारो वारकरी माऊलींना चहा, बिस्किटे, पिण्याचे स्वच्छ पाणी व इतर आवश्यक सेवा पुरविण्याचा संकल्प आपल्या डराडो (DARADO NGO) परिवाराने केला आहे.
ही सेवा केवळ एका संस्थेची नसून, ती आपण सर्वांनी मिळून उभी करायची संतसेवा आहे. आपल्या सहकार्याशिवाय हे कार्य पूर्णत्वास नेणे शक्य नाही.
आपण आपल्या सोयीनुसार,आपल्या स्वेच्छेने कितीही रक्कम देऊ शकता..., तसेच पाण्याच्या बाटल्या, बिस्किटपुडे , चहा साहित्य, साखर, दूध किंवा इतर आवश्यक वस्तू देऊन या पुण्यकार्यात सहभागी होऊ शकता.
देणगीची रक्कम मोठी की छोटी याला महत्त्व नाही; महत्त्व आहे ते संतसेवेच्या भावनेला.
हजारो माऊलींमध्ये एखादा थकलेला वारकरी जेव्हा आपल्या मदतीतून मिळालेला एक कप चहा, एक पाण्याची बाटली किंवा एक बिस्किटाचा पुडा स्वीकारतो, तेव्हा ती केवळ मदत राहत नाही तर ती माऊलींच्या चरणी अर्पण केलेली सेवा बनते.
🌼 "एक हात मदतीचा... हजारो माऊलींच्या सेवेसाठी!" 🌼
🙏 "एक बाटली पाणी, एक बिस्किट पुडा, आणि एक कप चहा...
कदाचित एखाद्या थकलेल्या वारकऱ्यासाठी तोच माऊलींचा प्रसाद ठरेल." 🙏
आपले स्वेच्छेचे योगदान हजारो भाविकांच्या सेवेत थेट उपयोगी पडणार आहे.
*🙏 कृपया नम्र विनंती की, आपण देणगी देताना बारकोड संस्थेचाच आहे की नाही हे तपासून पहावे म्हणजे आपली देणगी योग्य ठिकाणी जाईल यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही 🙏*
✨ "आपली मदत हीच माऊलींची सेवा,
माऊलींची सेवा हीच मानवसेवा, आणि मानवसेवा हाच खरा धर्म!" ✨
चला, आपल्या कष्टाच्या कमाईतील छोटासा वाटा संतांच्या सेवेसाठी अर्पण करूया आणि या पुण्य कार्यात सगळे सहभागी होऊया.
📞 अधिक माहितीसाठी :
ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात.
डायरेक्टर – डराडो (DARADO NGO)
मो. +91 91752 81190.
🌺🙏 "देणगीची रक्कम नव्हे, तर सेवेची भावना मोठी असते."
"चला, आपण सर्वजण एकत्र येऊन माऊलींच्या चरणी सेवा अर्पण करूया!" 🙏🌺
0 Response to "दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हजारो वारकरी माऊलींना चहा, बिस्किटे, पिण्याचे स्वच्छ पाणी व इतर आवश्यक सेवा पुरविण्याचा संकल्प"
Post a Comment