जि.प.प्राथमिक शाळा अमानी येथे शाळा प्रवेशोत्सव दिनी
जि.प.प्राथमिक शाळा अमानी येथे शाळा प्रवेशोत्सव दिनी
सरपंच अनिल भाऊ जाधव यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप.... प्राथमिक वरिष्ठ केंद्रीय शाळा अमानी येथे गावचे सरपंच अनिल भाऊ जाधव व शाळा समिती अध्यक्ष संजय खिल्लारी यांच्या हस्ते शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना शालेय गणवेश व पुस्तक वाटप करण्यात आले याविषयी असेही शासनाने ठरविलेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी शाळेमध्ये आल्यानंतर शालेय पुस्तक व गणवेशाचे वाटप करण्याचे नियोजित होते त्यानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नवागतांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अमानी गावचे सरपंच श्री.अनिल भाऊ जाधव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय खिल्लारी, मुख्याध्यापक सुनील बनसोड सर ग्रामपंचायत सदस्य गजानन ठाकरे व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय गणेश आणि पाठ्यपुस्तके दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा द्विगुणित झाला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गावातील पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
0 Response to "जि.प.प्राथमिक शाळा अमानी येथे शाळा प्रवेशोत्सव दिनी "
Post a Comment