-->

वसंतराव नाईक विद्यालयात कृषी दिन व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

वसंतराव नाईक विद्यालयात कृषी दिन व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी



 साप्ताहिक सागर आदित्य 

वसंतराव नाईक विद्यालयात कृषी दिन व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी


मानोरा,  : वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे   रोजी कृषी दिन तसेच हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय  सतीश भगत सर यांच्या हस्ते हरित क्रांतीचे प्रणेते  वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


अध्यक्षीय भाषणात  सतीश भगत सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्व. वसंतराव नाईक यांनी आपल्या दूरदृष्टी, कर्तृत्व आणि शेतकरीहिताच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. शेती, जलसंधारण, ग्रामीण विकास आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची भावना जोपासावी. तसेच कृषी क्षेत्राचे महत्त्व ओळखून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड व निसर्ग संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कृषी दिनाचे महत्त्व, आधुनिक शेती, अन्नसुरक्षा आणि पर्यावरण संवर्धन याविषयी माहिती देण्यात आली. तसेच यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0 Response to "वसंतराव नाईक विद्यालयात कृषी दिन व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article