भा.मा.कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय प्रवेशोत्सव दिनी पुस्तके, शालेय युनिफॉर्म, आणि पुष्पगुच्छ देऊन नवगतांचे स्वागत...
साप्ताहिक सागर आदित्य
भा.मा.कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय प्रवेशोत्सव दिनी पुस्तके, शालेय युनिफॉर्म, आणि पुष्पगुच्छ देऊन नवगतांचे स्वागत...
रिसोड तालुक्यातील एकमेव उपक्रमशिल आणि उत्कृष्ट निकाल देणारे भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे शैक्षणिक सत्र सन २०२६-२०२७ या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव दिनी इयत्ता पाचवी ते बारावी च्या विद्यार्थिनींचे प्रथमतः पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात त्यानंतर शालेय पुस्तके आणि युनिफॉर्म शाळेच्या वतीने वाटप करण्यात आले. याप्रसंगी भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मंजुषा सु.देशमुख मॅडम व पर्यवेक्षक सुनील डहाळके सर व जेष्ठ शिक्षक सुधीर देशमुख सर या हस्ते प्रथमतः नवगतांचे स्वागत करण्यात आले. तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थिनी सोबत आलेल्या पालकांची सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना पहिल्याच दिवशी शालेय युनिफॉर्म आणि नवीन पाठ्यपुस्तके दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळाला. शाळेमध्ये असलेल्या भौतिक सुविधा त्यामध्ये संगणक लॅब, ग्रंथालय ,डिजिटल क्लासरूम, प्रत्येक क्लासमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, उच्च विद्या विभूषित शिक्षक-शिक्षिका, टोलेजंग शाळेची तीन मजली प्रशस्त इमारत अशी भारत कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थिनी सोबत आलेल्या पालकवर्गांनी बघितली व समाधान आणि आनंद व्यक्त केला. तसेच शाळेच्या चढत्या आलेखा बरोबरव गुणवत्ते बाबत समाधान व्यक्त केले. शालेय प्रवेशोत्सवानिमित्त शाळा सुशोभीत करण्यात आली होती. पहिल्याच दिवशी जवळ जवळ विद्यार्थिनींची 75% टक्के उपस्थिती होती. या शालेय प्रवेशोत्सवा निमित्त व नवगतांचे स्वागत सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता सर्व पालक वर्गांना चहा व नाश्ता देऊन करण्यात आली.
0 Response to "भा.मा.कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय प्रवेशोत्सव दिनी पुस्तके, शालेय युनिफॉर्म, आणि पुष्पगुच्छ देऊन नवगतांचे स्वागत..."
Post a Comment