-->

समस्याग्रस्त महिलांसाठी १५ जून रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

समस्याग्रस्त महिलांसाठी १५ जून रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

समस्याग्रस्त महिलांसाठी १५ जून रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन


वाशिम, : समस्याग्रस्त, पीडित व गरजू महिलांना त्यांच्या तक्रारी, अडचणी व समस्या थेट प्रशासनासमोर मांडता याव्यात तसेच त्यांचे प्रश्न शासकीय यंत्रणेमार्फत प्रभावीपणे सोडविता यावेत, यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.

याअनुषंगाने जून महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, १५ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

या लोकशाही दिनात महिलांच्या विविध तक्रारी, कौटुंबिक समस्या, अत्याचार, न्याय मिळविण्यासंदर्भातील अडचणी तसेच इतर शासकीय योजनांशी संबंधित प्रश्नांवर संबंधित विभागांच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील समस्याग्रस्त, पीडित व गरजू महिलांनी आपल्या तक्रारी व निवेदने घेऊन या महिला लोकशाही दिनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे यांनी केले आहे.

0 Response to "समस्याग्रस्त महिलांसाठी १५ जून रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article