सवड येथील शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू
साप्ताहिक सागर आदित्य
सवड येथील शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू
वाशिम, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, सवड ता. रिसोड जि. वाशिम येथील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृह प्रशासनाने केले आहे.
मागासवर्गीय प्रवर्गनिहाय रिक्त असलेल्या आरक्षित जागांनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग तसेच अनाथ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.
शालेय विभागातील इयत्ता ८ वी, कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी तसेच बिगर व्यावसायिक व व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वसतिगृहामार्फत विद्यार्थ्यांना निवासासह शासनाच्या विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याने पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, सवड ता. रिसोड जि. वाशिम येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे प्रशासनाने कळविले आहे.
0 Response to "सवड येथील शासकीय वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू"
Post a Comment