अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांनी महामंडळाच्या कर्ज व अनुदान योजनांचा लाभ घ्यावा
साप्ताहिक सागर आदित्य
अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांनी महामंडळाच्या कर्ज व अनुदान योजनांचा लाभ घ्यावा
वाशिम, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या बीज भांडवल व अनुदान योजनेंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यासाठी ३० प्रकरणांचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एल. जे. भोयर यांनी केले आहे.
महामंडळाच्या कर्ज व अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी www.mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनकार्ड, दरपत्रक तसेच प्रकल्प अहवाल आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नालंदा नगर, वाशिम येथे सादर करावेत. असे जिल्हा व्यवस्थापक एल.जे.भोयर यांनी कळविले आहे.
0 Response to "अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांनी महामंडळाच्या कर्ज व अनुदान योजनांचा लाभ घ्यावा"
Post a Comment