-->

हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज व अनुदान योजनेसाठी अर्ज मागविले

हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज व अनुदान योजनेसाठी अर्ज मागविले



साप्ताहिक सागर आदित्य 

 हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज व अनुदान योजनेसाठी अर्ज मागविले


 वाशिम,  हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्या. (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाअंतर्गत उपकंपनी) यांच्या बीज भांडवल व अनुदान योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात  जिल्ह्यासाठी दोन प्रकरणांचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील तसेच हिंदू खाटीक संवर्गातील पात्र इच्छुक अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुकांनी महामंडळाच्या www.hksedcl.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनकार्ड, दरपत्रक तसेच प्रकल्प अहवाल आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.

संपूर्ण प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नालंदा नगर, वाशिम येथे सादर करावेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी मुदतीत अर्ज सादर करून शासनाच्या स्वयंरोजगार व आर्थिक सक्षमीकरणाच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एल. जे. भोयर यांनी केले आहे.

0 Response to "हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज व अनुदान योजनेसाठी अर्ज मागविले"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article