राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्याला मिळाला वाढीव इष्टांक
साप्ताहिक सागर आदित्य
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्याला मिळाला वाढीव इष्टांक
वाशिम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्याला शासनाकडून वाढीव इष्टांक मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये अंत्योदय अन्न योजनेसाठी ५१ हजार २९८ तर प्राधान्य कुटुंब योजनेसाठी ८ लाख ५३ हजार ९०१ इतका वाढीव इष्टांक प्राप्त झाला आहे.
प्राप्त झालेला वाढीव इष्टांक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना त्यांच्या गरजेनुसार विभागून देण्यात आला असून, त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
त्यामुळे अनेक प्रतीक्षाधीन कुटुंबांना आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत विशेषतः दिव्यांग व्यक्ती, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिला तसेच अत्यंत गरजू घटकांना प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पात्र लाभार्थ्यांना दिलासा मिळणार असून अन्नसुरक्षा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.असे जिल्हा पुरवठा अधिकारी दीपक बाजड यांनी कळविले आहे.
0 Response to "राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्याला मिळाला वाढीव इष्टांक"
Post a Comment