-->

बोराळा जहागीर येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा...

बोराळा जहागीर येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा...



साप्ताहिक सागर आदित्य 

 बोराळा जहागीर येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा...

तालुका मालेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बोराळा जहागीर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352 शिवराज्याभिषेक सोहळा आज अत्यंत पारंपारिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत आणि स्थानिक शिवप्रेमी मंडळाच्या वतीने 

आयोजित या कार्यक्रमात परिसरातील अबाल वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .पहाटे गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रौढ प्रताप पुरंदराच्या जयघोषित भव्य भगवा ध्वज फडकवू शिवरायाची गुढी उभारण्यात आली. त्यानंतर गावचे 

सरपंच सौ.पुष्पा गजानन जटाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

ग्रामसेवक उद्धव गावंडे यांनी सुद्धा प्रतिमेची पूजन केले. तसेच संतोष घायाळ यांनी सुद्धा प्रतिमेचे पूजन केले. लोकांचा सहभाग आणि गावकऱ्यांची भावना या सोहळ्यामुळे संपूर्ण गावात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते .ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर शिवराज्यभिषेकाचा आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसत होता .

सोहळा संपल्यानंतरही उपस्थित्यामध्ये जय भवानी जय शिवराय चा गजर घुमत होता . प्रत्येकाने महाराजांच्या विचारावर चालण्याचा संकल्प केला .भावी पिढीसाठी प्रेरणा ऐतिहासिक महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केवळ एक धार्मिक किंवा ऐतिहासिक विधी नसून तो रयतेला दिलेल्या आणि विश्वासाचा दिवस आहे हा सोहळा ग्रामीण भागात नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची आणि इतिहासाची व त्यांच्यामध्ये देशप्रेम जागवणारा ठरला .ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहात व शिस्तीत या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता करण्यात आली.

0 Response to "बोराळा जहागीर येथे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा..."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article