-->

एसबीआय आरसिटी वाशिम येथे राष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा        स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था वाशिम येथे

एसबीआय आरसिटी वाशिम येथे राष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था वाशिम येथे



साप्ताहिक सागर आदित्य 

 एसबीआय आरसिटी वाशिम येथे राष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा 

     स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था वाशिम येथे 

राष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा करत असताना लाभलेल्या प्रमुख  सौ.मंजुश्री जांभरुणकर मॅडम बालकल्याण विभाग वाशिम तसेच आदरणीय ढाले सर व स्टेट बँक ग्रामीण प्रशिक्षण संस्थेतील सर्व सर्व कार्यरत कर्मचारी वर्ग आणि संचालक धनाजी बोईले सर ,एसबीआयआरसिटी वाशिम  च्या व्याख्याता वनिता सुभाष साबळे मॅडम  तसेच ऑफिस असिस्टंट योगेश कुमार ठाकूर, तेजश्री निचडे मॅडम, ऑफिस स्टाफ महेंद्र सम्रत व महादेव भोयर, डीएसटी शिंदे मॅडम ,समीना मॅडम लोंढे मॅडम व ब्युटी पार्लर, महिला शिवणकाम ,आरी वर्क च्या सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी या 

उपक्रमासाठी हजर होत्या. यामध्ये मंजुश्री मॅडमने खूप मोलाचे मार्गदर्शन केले आहे . मॅडमच्या हस्ते एकूण पाच प्रकारचे झाडे लावण्यात आले. यामध्ये वडाचे, पिंपळाचे ,नारळाचे झाड लावण्यात आले .मंजुश्री मॅडम मार्गदर्शन करत असताना त्यांनी खूप उदाहरणे दिली पर्यावरणाचे संरक्षण करत असताना त्यांनी पाण्याचे संरक्षण करायचे तसेच पॉलिथिन बाहेर न फेकता तर डिझेल करण्यासाठी मशीन 

तयार करा असे पण उद्योजकांना सांगितले. तसेच झाडे तोडायला कधीही परवानगी देऊ नये असे ही आपल्या मनोबोधातून सांगितले. प्रत्येक रोडच्या साईडला जितके जास्तीत जास्त झाडे लावता येतील तितके लावण्याचा प्रयत्न करावा . पर्यावरणाचे संरक्षण करा नदीचे पाणी घाण करू नका ,म्हणजे त्यांनी हेही 

उदाहरण दिले आहे की मेलेल्या माणसाची राख जी आपण नदीत सोडतो ते नदीत न सोडता जर त्याला प्रत्येक माणसाची ओळख म्हणून एक झाड 

लावले त्या राखेमध्ये तर माणूस जिवंतच राहतो .असे वेगवेगळे उदाहरणे देऊन  प्रशिक्षणार्थ्यांना भावी उद्योजकांना पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी उद्युक्त केले . बाईले सरांनी पण पर्यावरणाचे संरक्षण करा .आपली पृथ्वी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा असे मोलाचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थ्यांना केले . मंजुश्री मॅडमने संपूर्ण एसबीआय आर सिटी चा परिसर बघितला असता त्यांनी प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांना भेट दिली असता त्यांना प्रशिक्षण खूप आवडले इतक्या सुविधा शासन अशा प्रशिक्षणार्थ्यांना देत आहे हे बघून त्यांनी एसबीआय आरसीटी ची  खूप  स्तुती केली आणि अशा प्रकारचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना उद्युक्त करावे असे 

सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सांगितले.

0 Response to "एसबीआय आरसिटी वाशिम येथे राष्ट्रीय पर्यावरण दिन साजरा स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था वाशिम येथे "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article