-->

माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे उपशिक्षणाधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी यांना निवेदन.

माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे उपशिक्षणाधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी यांना निवेदन.



साप्ताहिक सागर आदित्य 

 वाशिम जिल्ह्यातील कला टेट धारक माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे उपशिक्षणाधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी यांना निवेदन.......  

  सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पवित्र पोर्टल २०२५ अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच पदभरती जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत .15 मार्च 2024 नुसार संच मान्यता आणि यामध्ये कलाशिक्षक पदाचा समावेश करण्यात आलेला असून 501 व त्या पुढील विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये ही पदे भरण्याची तरतूद करण्यात आलेली आहे .त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पात्र प्राथमिक व माध्यमिक  शाळांना त्यासंदर्भात  सूचना देऊन येणाऱ्या 15 जून 2026 या अंतिम तारखेपर्यंत कला या पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात यावी. अशी विनंती जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक उपशिक्षणाधिकारी व तसेच  वाशिमचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करून निवेदनानुसार योग्य अंमलबजावणी होईल. असे आश्वासन त्यांनी दिले .  व तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये "महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ महामंडळ "यांच्या मार्गदर्शनातून सर्व ठिकाणी निवेदने देण्यात येत आहेत. यावेळी वाशिम जिल्ह्यातील कला टेट धारक गणेश सोळंके सर गजानन गोटे सर भोयर सर आदी जिल्ह्यातील कलाशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनातून अन्यायग्रस्त शिक्षकाला न्याय मिळावा हीच अपेक्षा.

0 Response to "माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे उपशिक्षणाधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी यांना निवेदन."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article