“राज्यातील #कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी
साप्ताहिक सागर आदित्य
“राज्यातील #कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी
कृषी विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण ३,७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे. २००३ नंतर म्हणजेच २३ वर्षांनी नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यापीठांमधील मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल, संशोधन व अध्यापनाच्या गुणवत्तेत वाढ होईल तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत अधिक वेगाने पोहोचविण्यास मदत मिळेल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या गट-अ व गट-ब संवर्गातील पदांच्या सुधारित आकृतीबंधास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. कृषी व पदुम विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, नियमित ३,६११ पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणारी ११२ पदे अशा एकूण ३,७२३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे १,२१७, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे ५८९, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे ८९० आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे ९१५ नियमित पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. तसेच काही पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
शासन निर्णय 👇
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202606101324371401.....pdf
0 Response to "“राज्यातील #कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी "
Post a Comment