-->

पीएम-कुसुम सौर कृषी पंप लाभार्थ्यांसाठी महाऊर्जाच्या कार्यशाळांचे आयोजन

पीएम-कुसुम सौर कृषी पंप लाभार्थ्यांसाठी महाऊर्जाच्या कार्यशाळांचे आयोजन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

पीएम-कुसुम सौर कृषी पंप लाभार्थ्यांसाठी महाऊर्जाच्या कार्यशाळांचे आयोजन


वाशिम,  जागतिक पर्यावरण दिन अभियानांतर्गत  ५ जुलै २०२६ पर्यंत महाउर्जामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानादरम्यान पीएम-कुसुम योजना घटक-ब अंतर्गत प्रलंबित सौर कृषी पंप आस्थापनेला गती देण्यासाठी तसेच आस्थापित सौर कृषी पंपांबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महाऊर्जामार्फत विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.


वाशिम जिल्ह्यात तालुका व ग्रामपंचायत स्तरावर या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून दि. १६ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता वाशिम तालुक्यातील तामसी येथील ग्रामपंचायत कार्यालयात, दुपारी १२ वाजता मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील ग्रामपंचायत कार्यालयात तसेच दि. १७ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता रिसोड तालुक्यातील केनवड येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यशाळा होणार आहेत.


पीएम-कुसुम योजना घटक-ब अंतर्गत सौर कृषी पंप प्राप्त लाभार्थ्यांच्या पंप दुरुस्तीविषयक तक्रारी, तांत्रिक अडचणी तसेच प्रलंबित सौर कृषी पंप आस्थापनेबाबतच्या समस्यांची नोंदणी या कार्यशाळांमध्ये करण्यात येणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी कार्यशाळांना उपस्थित राहून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.


 "वाशिम जिल्ह्यातील पीएम-कुसुम योजनेतील सर्व सौर कृषी पंप लाभार्थ्यांनी या शिबिरांना व कार्यशाळांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा".


– विजय काळे

जिल्हा व्यवस्थापक, महाऊर्जा, यवतमाळ.

0 Response to "पीएम-कुसुम सौर कृषी पंप लाभार्थ्यांसाठी महाऊर्जाच्या कार्यशाळांचे आयोजन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article