-->

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू



 साप्ताहिक सागर आदित्य 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू


वाशिम,  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संचालित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह, चिखली रोड, नालंदा नगर, वाशिम येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.


वसतीगृहात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ४८ पैकी दिव्यांग १ व अनाथ २, इतर मागासवर्गीय (ओबीसी) १ व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) २ अशा एकूण ५१ रिक्त जागांवर जातनिहाय आरक्षण व गुणवत्ता यादीनुसार ऑनलाईन प्रवेश देण्यात येणार आहे.


इच्छुक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत.


प्रवेशासाठी पात्रता

१. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

२. विद्यार्थ्याने सन २०२६ मध्येच किमान ६० टक्के गुणांसह इयत्ता दहावी उत्तीर्ण केलेली असावी.

३. विद्यार्थी वाशिम शहरातील महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये प्रवेशित असावा.

४. पालकांचे वार्षिक उत्पन्न अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी २.५० लाख रुपयांपर्यंत तसेच ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी प्रवर्गासाठी १.५० लाख रुपयांपर्यंत असावे.


अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), इयत्ता दहावीची गुणपत्रिका, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल), महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, तसेच राष्ट्रीयीकृत बँक अथवा पोस्ट खात्याची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.


विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा

शासकीय नियमानुसार मोफत नाश्ता व दोन वेळचे भोजन, मोफत निवास व्यवस्था, पलंग व अंथरूण-पांघरूण, कपाट, पंखे, शौचालय व स्नानगृह, गरम पाण्याची सुविधा, शैक्षणिक साहित्याकरिता वार्षिक ४ हजार रुपये, दरमहा १ हजार ३०० रुपये निर्वाह भत्ता, गणवेशासाठी वार्षिक २ हजार रुपये, छत्री/रेनकोट व गमबूटसाठी ५०० रुपये, मनोरंजन कक्ष, अभ्यासिका, २४ तास इंटरनेट व वाय-फाय सुविधेसह २० संगणकांची ई-लायब्ररी, सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षक व्यवस्था, आरओ पिण्याचे पाणी तसेच अद्ययावत जिम व ओपन जिम सुविधा उपलब्ध आहेत.


प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृह, चिखली रोड, नालंदा नगर, वाशिम येथील कार्यालयाशी दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान संपर्क साधावा. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन व आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे वसतीगृह अधीक्षक शेषराव इंगोले यांनी कळविले आहे.

0 Response to "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article