-->

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 


साप्ताहिक सागर आदित्य 

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


 जिल्ह्यात २ हजार ५९४ प्रकरणांचा निपटारा


वाशिम,   शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हाभर आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून आयोजित या शिबिरांमध्ये विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी, अर्ज आणि मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करण्यात येत असून अनेक प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आयोजित शिबिरांदरम्यान महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, कृषी, आरोग्य, महिला व बाल विकास तसेच इतर विभागांच्या योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांना आवश्यक दाखले, प्रमाणपत्रे, योजनांची माहिती तसेच विविध शासकीय सेवांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला.

प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यात ७३९, मालेगावमध्ये २८६, रिसोडमध्ये ३२५, मानोरामध्ये १४४, मंगरुळपीरमध्ये ६३५ तर कारंजा तालुक्यात ४६५ अशा एकूण २ हजार ५९४ प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली.


शिबिरांमध्ये नागरिकांच्या समस्या समजून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही केली. अनेक प्रकरणांचा तात्काळ निपटारा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांपासून दिलासा मिळत असून प्रशासन जनतेच्या दारी पोहोचत असल्याची भावना यावेळी लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या.


शासनाच्या योजना प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी अशा ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरां’ची भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याची प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

0 Response to "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article