महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ परीक्षेत पात्र उमेदवारांना १८ मे ८ जून २०२६ या कालावधीत प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे.
साप्ताहिक सागर आदित्य
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पात्र उमेदवारांना प्रमाणपत्रे प्राप्त करून घेण्याचे आवाहन
वाशिम, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ परीक्षेत पात्र उमेदवारांना १८ मे ८ जून २०२६ या कालावधीत प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह आपण परीक्षा दिलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
महाटीईटी- २०२५ परीक्षेचे आयोजन २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्र. १ (इ. १ ली ते इ. ५ वी स्तर) व पेपर क्र. २ (इ. ६ वी ते इ. ८ वी स्तर) चा अंतिम निकाल ३ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेला होता.
महाटीईटी परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांच्या कार्यालयाकडे देण्यात येत आहेत. पात्रता धारक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी परीक्षा परिषदेच्या http://www.mscepune.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
0000
0 Response to "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ परीक्षेत पात्र उमेदवारांना १८ मे ८ जून २०२६ या कालावधीत प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. "
Post a Comment