जनगणना - २०२७ अंतर्गत घर यादी व घरगणना प्रक्रिया यंदा डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
साप्ताहिक सागर आदित्य
जनगणना - २०२७ साठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे
घरगणना व घर यादीसाठी येणाऱ्या प्रगणकांना माहिती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
वाशिम, दि. १५ मे जनगणना - २०२७ अंतर्गत घर यादी व घरगणना प्रक्रिया यंदा डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
जनगणना प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांकडून नागरिकांच्या घर यादी व घरगणनेची आवश्यक नोंद करण्यात येणार आहे. प्रगनक दि. १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त प्रगणक घरभेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत. ज्या नागरिकांनी स्वगणना गणना केली आहे, त्यांनी एसईआयडी आलेल्या प्रगणकांना द्यायचा आहे, प्रगणक भरलेली माहिती तपासून सबमिट करतील.
या प्रक्रियेदरम्यान शासनाने निर्धारित केलेल्या जनगणनेसंदर्भातील ३३ प्रश्नांची माहिती नागरिकांना प्रगणकांना द्यावी लागणार आहे. या माहितीच्या आधारे संबंधित नागरिकांची नोंद जनगणनेच्या एचएलओ ॲपवर करण्यात येणार आहे.
घर यादी व घरगणना प्रक्रियेत इमारत व घर क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग व प्रवर्ग, राहण्याच्या खोल्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची संख्या, उपलब्ध सुविधा, मालमत्ता, साहित्य आदी विविध बाबींची माहिती विचारली जाणार आहे. या सर्व माहितीच्या आधारे घर यादी व घरगणनेचे काम डिजिटल स्वरूपात पूर्ण करण्यात येईल. तसेच जनगणना - २०२७ संदर्भातील नागरिकांची माहिती पूर्णपणे गोपनीय व सुरक्षित ठेवली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी जनगणना - २०२७ च्या टप्पा क्रमांक १ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून दि. १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत होणाऱ्या घर यादी व घरगणना प्रक्रियेसाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांना आवश्यक माहिती देऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
जिल्ह्यासाठी एकूण २१७४ घरगणना प्रभाग (HLB) तयार करण्यात आले असून, या कामासाठी १ मास्टर ट्रेनर, ४२ फिल्ड ट्रेनर, २२१८ प्रगणक आणि ३७८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जनगणना - २०२७ अंतर्गत घर यादी व घरगणनेचे काम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
0 Response to "जनगणना - २०२७ अंतर्गत घर यादी व घरगणना प्रक्रिया यंदा डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे."
Post a Comment