बोराळा जहागीर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी....
साप्ताहिक सागर आदित्य
बोराळा जहागीर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी....
वाशिम जिल्ह्यातील मौजे बोराळा जहागीर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त मौजे बोराळा जहागीर येथे भव्य रक्तदान व मोफत तपासणी शिबिर कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमाला गावकरी मंडळींनी चांगला प्रतिसाद दिला. शिबिरातील तज्ञ डॉ. किशोर मुखमाले सर ,डॉ. सतीश जाधव सर, डॉ. अश्विन हाके सर ,डॉ.अक्षय किशोर लहाने सर ,डॉ. परमेश्वर खराट , डॉ प्रतीक महाजन वाशिम जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांचा संघ बोराळा जहागीर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये रक्तदान शिबिर, ऑर्थोपेडिक तपासणी ,नेत्र तपासणी ,हृदयरोग तपासणी दंत तपासणी व तसेच बालरोग तपासणी इत्यादी तपासण्या करून शिबिरातील सहभागी गावकरी मंडळींना योग्य मार्गदर्शन केले. तसेच गरजू गावकरी मंडळींना निशुल्क औषध औषधांचा वाटप केला . गावातील जवळपास 25 च्या वर तरुणांनी रक्तदान केले .रक्तदान केल्याबद्दल सर्व तरुणांना डॉ. रुपेश जटाळे सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन बोराळा जहागीर येथील डॉक्टर रुपेश जटाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. सकाळी हा कार्यक्रम यशस्वी पार पडल्यानंतर सायंकाळी सात वाजता नंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात संपूर्ण गावातून काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
0 Response to "बोराळा जहागीर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी...."
Post a Comment