-->

‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा’च्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे.

‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा’च्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा’च्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. 

आखाड्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रती आखाडा पाच कोटींचा निधी, छोट्या संस्थांसाठी प्रती संस्थान १५ लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकाची प्राधिकरणाच्या माध्यमातून अदायगी, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत केली.


कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या साधू, महंत व भाविक यांची सेवा करीत त्यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिह राजे भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

#कुंभमेळा२०२७

#KumbhMela2027

0 Response to "‘नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा’च्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article