वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात
साप्ताहिक सागर आदित्य
मानोरा :
वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात
व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरूवात शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय प्रसेन भगत सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा सखोल आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भारतीय संविधानाची निर्मिती करून देशाला समता,बंधुता, व न्यायाचा मार्ग दाखविला. असे मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात"
Post a Comment