-->

उमेद अभियानाची जिल्ह्यात ग्रामीण भागात दमदार वाटचाल  हजारो महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा

उमेद अभियानाची जिल्ह्यात ग्रामीण भागात दमदार वाटचाल हजारो महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा



 साप्ताहिक सागर आदित्य 

उमेद अभियानाची जिल्ह्यात ग्रामीण भागात दमदार वाटचाल

हजारो महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा


 ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारे उमेद अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबविले जात असून, त्यातून महिलांच्या आर्थिक उन्नतीला भक्कम आधार मिळत आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान अंतर्गत सुरू असलेल्या या अभियानाने जिल्ह्यात व्यापक स्वरूप धारण केले आहे. जिल्ह्यात आजघडीला एकूण १३,२२४ महिला बचत गट कार्यरत असून, या गटांच्या माध्यमातून महिलांची संघटित शक्ती उभी राहत आहे. या गटांचे एकत्रीकरण करून ६५७ ग्राम संघ स्थापन करण्यात आले आहेत. पुढे या ग्राम संघांचे संघटन करून ५१ प्रभाग संघ तयार करण्यात आले असून, यामुळे व्यवस्थापन आणि समन्वय अधिक सुलभ झाला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला


चालना देण्यासाठी जिल्ह्यात १० महिला शेतकरी उत्पादन कंपन्या कार्यरत आहेत. तसेच एकाच प्रकारचा उद्योग करणाऱ्या महिलांना एकत्र आणून ३२७ उत्पादक गट स्थापन करण्यात आले या माध्यमातून महिलांना व्यवसायिक आहेत. गटांच्या


दृष्टिकोन, उत्पादन क्षमता आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच मिळत आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उमेद अभियानांतर्गत महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. 


यामध्ये ७३२ गटांना प्रत्येकी ३० हजार रुपये प्रमाणे फिरता

निधी देण्यात आला आहे. 


 ४,०८३ गटांना प्रत्येकी ६० हजार रुपये एकूण २८७२ लक्ष (समुदाय गुंतवणूक निधी) देऊन त्यांच्या व्यवसायवृद्धीस चालना देण्यात आली आहे. 


 बँक कर्ज ४४४१ गटांना रुपये १७० कोटी वितरित करण्यात आले आहे 


तसेच व्यवसाय वाढीकरिता एकूण १९५  उत्पादक गटांना ५७५ लक्ष रुपये वितरित करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून महिलांना उद्योग विस्तार, उत्पादन वाढ आणि रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. उमेद अभियानच्या माध्यमातून वरील सर्व बाबीची प्रभावीपणे अंबलबजावणी  केली जात आहे.


याकरिता जिल्हा ते ग्रामपातळीपर्यंत सक्षम यंत्रणा उभारण्यात आली असून, महिलांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य पुरविण्यात येत आहे. या अभियानामुळे महिलांच्या जीवनमानात लक्षणीय बदल दिसून येत आहे. स्वतःचा व्यवसाय उभारणे, कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालणे आणि समाजात सन्मानाने वावरणे हे स्वप्न आज अनेक महिलांनी प्रत्यक्षात साकारले आहे. आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि आर्थिक स्वातंत्र्य या तिन्ही बाबींमध्ये महिलांची प्रगती स्पष्टपणे जाणवते. उमेद अभियानामुळे जिल्ह्यात महिलांच्या सक्षमीकरणाची एक नवी चळवळ निर्माण झाली असून,ग्रामीण भागात आर्थिक चळवळ निर्माण झालेली निदर्शनास येत आहे...भविष्यातही या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना स्वावलंबनाचा मार्ग खुला होणार आहे.त्या करिता उमेद अभियानाची जिल्हा तर गाव पातळीवरील सर्व यंत्रणा कटीबद्ध असून त्या दृष्टीने प्रयत्नशील आहे

0 Response to "उमेद अभियानाची जिल्ह्यात ग्रामीण भागात दमदार वाटचाल हजारो महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article