-->

मंगरुळपीर पंचायत समितीत विविध विकासकामांचा आढावा  सीईओ अर्पित चौहान यांची आढावा सभा.

मंगरुळपीर पंचायत समितीत विविध विकासकामांचा आढावा सीईओ अर्पित चौहान यांची आढावा सभा.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मंगरुळपीर पंचायत समितीत विविध विकासकामांचा आढावा

सीईओ अर्पित चौहान यांची आढावा सभा.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी आज (दि.15) मंगरुळपीर पंचायत समिती येथे बैठक घेऊन विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोन्द्रे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील तसेच गटविकास अधिकारी सारिका कारले -हिंगे, सहाय्यक गट विकास अधिकारी बाळकृष्ण अवगण, अविनाश ठाकूर यांची उपस्थिती होती.

या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत आवास योजना, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान (MSRLM), तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन (SLWM), ODF Plus मॉडेल व्हिलेज, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट, गोबरधन प्रकल्प व फिकल स्लज मॅनेजमेंट (FSM) यासंदर्भात आढावा घेण्यात आला.

तसेच पंचायत विभागातील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर, ग्रामपंचायत स्तरावरील कर वसुली, महिला व बालकल्याण तसेच दिव्यांग घटकांसाठीच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. मनरेगा अंतर्गत कामांची प्रगती, अपूर्ण कामे पूर्ण करण्याबाबत निर्देश, आधार आधारित देयके व वेळेत देयके देण्याबाबतही चर्चा झाली.

समाजकल्याण विभागांतर्गत दलित वस्ती विकास, महिला व बालकल्याण विभागातील पोषण ट्रॅकर, कुपोषण स्थिती, विविध योजना, तसेच शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, बांधकाम, जलसंधारण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीस सर्व ग्राम पंचायत अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.


0 Response to "मंगरुळपीर पंचायत समितीत विविध विकासकामांचा आढावा सीईओ अर्पित चौहान यांची आढावा सभा."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article