-->

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित युवक काल, आज आणि उद्या :- व्याख्याते गोपाल भिसडे  ( गोवर्धन येथे भीम जयंती उत्साहात साजरी )

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित युवक काल, आज आणि उद्या :- व्याख्याते गोपाल भिसडे ( गोवर्धन येथे भीम जयंती उत्साहात साजरी )



साप्ताहिक सागर आदित्य 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित युवक काल, आज आणि उद्या :- व्याख्याते गोपाल भिसडे

( गोवर्धन येथे भीम जयंती उत्साहात साजरी )

गोपाल भिसडे यांच्या भव्य व्याख्यानाचे आयोजन


रिसोड :- सार्वजनिक सत्यशोधक भीमजयंती उत्सव समिती गोवर्धन ता. रिसोड. जि. वाशिम आयोजित 14 एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील प्रेरणादायी व्याख्याते गोपाल भिसडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करून प्रभोधनाची विचारांच्या जयंतीचे आयोजन मौजे. गोवर्धन वासीय यांनी ठेऊन गावामध्ये विचारांची प्रभोधनाची पेरणी केली आहे,या जयंती निमित्ताने गोपाल भिसडे यांनी युवकावर जास्त जोर धरत बाबासाहेबाना अपेक्षित युवक व समाज या विषयावर प्रभोधन करत युवा वर्गाला या व्याख्यानातून मोलाचा संदेश दिला, यावेळी व्याख्याते गोपाल भिसडे म्हणाले काही माणसं इतिहास वाचतात, तर काही घडवतात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे युवाच्या काळजाचा विषय असला पाहिजे, नाचून जयंती साजरी न करता वाचून साजरी केली पाहिजे, सोबतच बाबासाहेबाचा विचार देखील पुढे नेला पाहिजे या दरम्यान काही उदाहरणं देऊन युवा शक्तीला राष्ट्रनिर्मिती साठी काम केले पाहिजे असं ही मत गोपाल भिसडे यांनी व्यक्त केले 



बाबासाहेबांचे किस्से वाचून युवा वर्गाला डोळ्यात पाणी येणं हे स्वाभाविक आहे, पण त्या अश्रूंचं रूपांतर विद्येत होणं हीच त्यांना खरी मानवंदना आहे.  केवळ सरकारी नोकऱ्यांच्या मागे धावणं ही बाबासाहेबांची अपेक्षा नव्हती. त्यांना असा तरुण हवा होता जो आर्थिक सत्ता आपल्या हातात घेईल.


आजचा तरुण अनेकदा परिस्थितीला दोष देत बसतो. पण बाबासाहेबांकडे कोणती साधनं होती? ना पैसा, ना वशिला, ना सामाजिक पाठबळ. तरीही त्यांनी जगातील सर्वात मोठं संविधान लिहिलं. तरुणांनी आज हे शिकायला पाहिजे, असे व्याख्याते म्हणाले सर्वात महत्वाचे म्हणजे 


१४ एप्रिलला मिरवणुकीत नाचणं नाही, तर त्यांनी दिलेलं वैचारिक तेज आपल्या कर्मात उतरवणं. जेव्हा एक वंचित मुलगा लॅपटॉपवर कोडिंग करून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवतो, जेव्हा एक तरुण उद्योजक शेकडो हातांना काम देतो, तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या संघर्षाचं चीज होतं.अशा विविध पैलूवर बोलत गोपाल भिसडे यांनी उपस्थित ग्रामस्थ युवक युवती, महिला, शेतकरी वर्गाला व्याख्यानाच्या माध्यमातून मोलाचा संदेश दिला,  या कार्यक्रमास  अमोल भाऊ खंडारे, ऍड. गौतम एन. अंभोरे, यांची उपस्थिती लाभली तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  उमेश लक्ष्मण कळासरे, यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदीश आंबादास अंभोरे यांनी केले, समता सैनिक दलाची मानवंदना देऊन कार्यक्रमास समारोप केला, यावेळी मोठया संख्येने ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती

0 Response to "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित युवक काल, आज आणि उद्या :- व्याख्याते गोपाल भिसडे ( गोवर्धन येथे भीम जयंती उत्साहात साजरी )"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article