माता व बाल आरोग्य बळकट करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन पोषण २.० व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात
साप्ताहिक सागर आदित्य
महिला सक्षमीकरणाला चालना
मिशन पोषण २.० व जननी शिशु सुरक्षा योजनेतून जिल्ह्यात ८५% प्रगती
वाशिम,दि.१७ एप्रिल माता व बाल आरोग्य बळकट करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन पोषण २.० व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात उल्लेखनीय प्रगती नोंदविण्यात आली आहे.
सन २०२५-२६ या कालावधीत मार्च २०२६ अखेरपर्यंत जिल्ह्यात ८५ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य झाली आहे.
जिल्ह्यासाठी एकूण ६२८० लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७८४७ नोंदणी झाली असून ६०२९ प्रसूती नोंदविण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांना पीएफएमएस प्रणालीद्वारे विविध हप्त्यांमध्ये आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले असून एकूण ५१५० लाभार्थ्यांना थेट लाभ मिळाला आहे.
ब्लॉकनिहाय कामगिरीत मंगरुळपीर (९८%) व कारंजा (९८%) हे तालुके आघाडीवर असून, वाशिम (८४%), रिसोड (८३%), मानोरा (८१%) यांनीही चांगली कामगिरी नोंदवली आहे. मालेगाव येथे (५७%) प्रगती असल्याचे दिसून येते.
यामुळे गर्भवती माता व बालकांना सुरक्षित प्रसूतीसाठी आर्थिक आधार मिळत आहे.
या योजनांमुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना मोफत उपचार, तपासण्या व आर्थिक सहाय्य उपलब्ध होत असून माता व बाल मृत्यूदर कमी करण्यास मदत होत आहे. तसेच महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढून त्यांच्या सशक्तीकरणाला चालना मिळत आहे.
एकूणच, मिशन पोषण २.० व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे वाशिम जिल्ह्यात माता-बाल आरोग्य अधिक सक्षम होत असून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ठोस पाऊल उचलले जात आहे.
#NariShaktiVandan #नारीशक्तीवंदन #महिला_सक्षमीकरण #WomenEmpowerment #समाज_विकास
0 Response to "माता व बाल आरोग्य बळकट करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन पोषण २.० व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात "
Post a Comment