-->

राज्याच्या पोलीस दलाची मान खाली जाईल अशी धक्कादायक घटना अकोल्यात समोर

राज्याच्या पोलीस दलाची मान खाली जाईल अशी धक्कादायक घटना अकोल्यात समोर



 साप्ताहिक सागर आदित्य 

 राज्याच्या पोलीस दलाची मान खाली जाईल अशी धक्कादायक घटना अकोल्यात समोर 

आलीय.. 80 लाखांच्या फसवणूक प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपी महिलेकडे, कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने 'शरीर सुखाची' मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय..या घटनेमुळे अकोला पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतलीय..संबंधित आरोपी महिलेनं महिला पोलीस कर्मचाऱ्याला या घटनेची माहिती दिली होती..त्यानंतर महिला कर्मचाऱ्याने तातडीने ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. आपल्याच विभागातील एका अधिकाऱ्याने असे नीच कृत्य केल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा पारा चढला. माहिती मिळताच वरिष्ठांनी थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले आणि तेथील संबंधित पोलीस  (ASI) ची चांगलीच कानउघडणी करत त्यांना सर्वांसमोर झापल्याचं समोर आलंय...

0 Response to "राज्याच्या पोलीस दलाची मान खाली जाईल अशी धक्कादायक घटना अकोल्यात समोर "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article