-->

 तुकाराम मुंढेंची २१ वर्षात २५ वी बदली; महाराष्ट्रातील 10 बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली

तुकाराम मुंढेंची २१ वर्षात २५ वी बदली; महाराष्ट्रातील 10 बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली

 


साप्ताहिक सागर आदित्य 

तुकाराम मुंढेंची २१ वर्षात २५ वी बदली; महाराष्ट्रातील 10 बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली


प्रशासनातील सिंघम म्हणून ख्याती असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे हे नेहमी ऑन मिशन असल्याचे म्हटले जाते. आता त्यांना या खात्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे कुणावर आपत्ती ओढवणार याची कुजबुज ते येण्यापूर्वीच या खात्यात सुरू झाली आहे


 आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली. २१ वर्षांच्या कारकि‍र्दीतील ही त्यांची २५ वी बदली आहे. मुंढे आणि बदली हे समीकरण तसं जुनंच आहे. मुंढे नेहमी ऑन मिशनच असतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही खात्यात पाठवले तरी ते ऑपरेशन करूनच बाहेर पडतात असा कर्मचार्‍यांचा दांडगा अनुभव आहे. राज्य सरकारने बुधवारी राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यात मुंढे यांचाही समावेश होता. आता तर तुकाराम मुंढे यांना आपत्ती व्यवस्थापन खात्याची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे कुणावर आपत्ती कोसळणार याची कुजबुज या विभागात सुरू झाली आहे.


गेल्या २१ वर्षांतील तुकाराम मुंढे यांची ही २५ वी बदली आहे. त्यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी असेल. ते या पदावर किती काळ राहतील हे महत्त्वाचे नाही तर ते या काळात काय धडाडीचे निर्णय घेतात याची मोठी चर्चा असते. ते जे काही निर्णय घेतात, त्यामुळे प्रशासन, अधिकारी आणि मंत्र्यांची पण धाबे दणाणते. त्यामुळे मुंढेंना आमच्या विभागात पाठवू नका यासाठी अनेक कर्मचारी देव पाण्यात ठेवतात. तर मुंढेंसारखा अधिकारी कामचुकार विभागात पाठवा अशी जनतेची मागणी असते.

  

दिव्यांग विभाग मुंढे येताच धावला


तुकाराम मुंढे यांच्याकडे यापूर्वी दिव्यांग विभागाची जबाबदारी होती. दिव्यांग विभागाची मरगळ त्यांनी झटकलीच पण अर्थपूर्ण कृत्यांनाही आळा घातला. दिव्यांगाची बोगस प्रमाणपत्र जोडून नोकऱ्या मिळवणारे कर्मचारी, अधिकाऱ्यांना एकामागून एक दणके दिले. बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द केली. बोगस प्रमाणपत्र वाटपातील कर्मचारी, अधिकारी यांच्याविरोधात कारवाईचा धडाकाच लावला. त्यामुळे संपूर्ण दिव्यांग खातंच नाही तर इतर खात्यातील अधिकारीही धास्तावले. दबाव वाढल्यानंतर मुंढे यांची बदली करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.


मुंढे हे २२०५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट २००५ मध्ये प्रशासकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त आणि सचिवपदी त्यांनी धडाडीने काम केले. प्रत्येक ठिकाणी त्यांची कामगिरी वाखणण्याजोगी होती. त्यांनी कर्मचाऱ्यांकडून शिस्तेचे धडे गिरवून घेतले. पाठीवर बिऱ्हाड असणारा अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्यावर बदलीचा काही एक परिणाम होत नाही.

0 Response to " तुकाराम मुंढेंची २१ वर्षात २५ वी बदली; महाराष्ट्रातील 10 बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article