-->

श्रीसंत सावता माळी व्यायाम प्रसारक मंडळाच्या मुलीनी सादर केली शिवकालीन युध्दकला

श्रीसंत सावता माळी व्यायाम प्रसारक मंडळाच्या मुलीनी सादर केली शिवकालीन युध्दकला



साप्ताहिक सागर आदित्य 

 श्रीसंत सावता माळी व्यायाम प्रसारक मंडळाच्या मुलीनी सादर केली शिवकालीन युध्दकला


वाशिम : वत्स्गगुल्म वाशीम 


नगरीतील मर्दानी खेळामध्‍ये पुरुषाच्या तुलनेत महीला सरस संत नगरी शेगाव येथे झाला गौरव शिवकालीन मर्दानी खेळ आणि शस्त्रकलेचा अभिमान जपत, आत्मसंरक्षणासोबतच ताकद, शौर्य आणि स्वाभिमानाची शिकवण देणारा हा आखाडा आज एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. दिनांक २८ व २९ मार्च २०२६ रोजी शेगाव येथे आयोजित मातृसंस्कार समागमात मातृशक्तीचा

भव्य जल्लोष पाहायला मिळाला. महिलांची उत्स्फूर्त रॅली, पारंपरिक सादरीकरणांसह 'रणचंडिका बहुउद्देशीय संस्था 'द्वारे संचालित श्री संत सावता माळी व्यायाम प्रसारक मंडळ वाशिमच्या मुली व मुलांकडून शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.


या सादरीकरणातून स्त्रीशक्तीचा आत्मविश्वास, जिद्द आणि पराक्रम ठळकपणे दिसून आला प्रमुख उपस्थिती म्हणून देवनाथ पिठाचे आचार्य श्री,जितेंद्रनाथ महाराज (गुरुजी) यांनी मुलींचे कौतुक केले आणि त्यांना आशीर्वाद दिला, तसेच आमदार डॉ. संजय कुटे यांनीही भरभरून प्रशंसा केली. आणि मुली आणि मुलांचे सत्कार करून त्यांचे उत्साह वाढवला व विश्वमंगल्य चे विदर्भप्रांताच्या संघटन मंत्री संगराताई चुंबळकर यांच्या उपस्थितीत शिवकाळीन युद्धकला सादर करण्यात आले आखाडयास प्रशिक म्‍हणुन लाभलेले गुरूवर्य श्री आंबादासजी महाराज इंगोले,राजशे राऊत,दामोधर इंगोले,केशव इंगोले,व प्रविण राऊत.वाशिम , हा अभिमान आहे, आणि हीच आमची ओळख आहे!

0 Response to "श्रीसंत सावता माळी व्यायाम प्रसारक मंडळाच्या मुलीनी सादर केली शिवकालीन युध्दकला"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article