जिल्ह्यात १५ मेपर्यंत ‘महाराजस्व समाधान’ शिबिरे; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्ह्यात १५ मेपर्यंत ‘महाराजस्व समाधान’ शिबिरे;
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
_जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
जिल्हास्तरीय 'वार्तालाप परिषदेचे' आयोजन
वाशिम, : मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महसूल विभागाच्या सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ हे अभियान दि.७ मार्चपासून ते दि. १५ मे २०२६ पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली आहे.
दि. २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्हिडीओ परिषदेमध्ये महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात तालुकास्तरावर मंडळनिहाय शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात वार्तालाप परिषद संपन्न झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, जिल्हा सहनिबंधक राजेश वजीरे तसेच भूमिअभिलेख विभागाच्या जिल्हा उपअधीक्षक शिल्पा सानप यांची प्रमुख उपस्थिती होती. संबंधित विभागांना शिबिरांचे नियोजन प्रभावीपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तालुकास्तरावर ‘महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान टप्पा क्र. १ चे वेळापत्रक
जिल्ह्यात तालुकास्तरावर व मंडळनिहाय वेळापत्रकानुसार महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ राबविण्यात येणार आहे.
* वाशिम तालुका
अनसिंग येथे ७ मार्च
पाडी आसरा येथे १४ मार्च
केकतउमरा व वारला येथे १० एप्रिल
पार्डी टकमोर व कोंडाळा झामरे येथे १७ एप्रिल
वाशिम येथे ८ मे
राजगाव व नागठाणा येथे १५ मे
* मंगरूळपीर तालुका
आसेगाव येथे ७ मार्च
धानोरा व पोटी येथे १४ मार्च
शेलू खुर्द येथे १० एप्रिल
कवठळ येथे १७ एप्रिल
मंगरूळपीर येथे ८ मे
पार्डी ताड येथे १५ मे
* रिसोड तालुका
मोप येथे ७ मार्च
रिठद येथे १४ मार्च
कवठा येथे २० मार्च
गोवर्धन येथे २७ मार्च
वाकद येथे १० एप्रिल
केनवड येथे १७ एप्रिल
रिसोड येथे ८ मे
भरजहाँगीर येथे १५ मे
* कारंजा तालुका
कामरगाव येथे ७ मार्च
खेर्डा बु. येथे १४ मार्च
उंबर्डा बाजार येथे २० मार्च
येवता येथे २७ मार्च
हिवरा लाहे येथे १० एप्रिल
धनज बु. येथे १७ एप्रिल
कारंजा येथे ८ मे
पोहा येथे १५ मे
* मालेगाव तालुका
करंजी येथे ७ मार्च
मेडशी येथे १४ मार्च
मुंगळा येथे २० मार्च
चांडस येथे २७ मार्च
जऊळका येथे १० एप्रिल
किन्हीराजा येथे १७ एप्रिल
मालेगाव येथे ८ मे
शिरपूर येथे १५ मे
* मानोरा तालुका
उमरी येथे ७ मार्च
शेंदुरजना येथे १४ मार्च
कुपटा येथे १० एप्रिल
इंझोरी येथे १७ एप्रिल
मानोरा येथे ८ मे
गिरोली येथे १५ मे २०२६
उपरोक्त संबंधित ठिकाणी नागरिकांनी उपस्थित राहून महसूल विषयक प्रश्नांचे तात्काळ निराकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.प्रत्येक तालुक्यातील विविध मंडळांमध्ये ठराविक तारखांना शिबिरे घेऊन महसूल विषयक प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्यात येणार आहे.
शिबिरांमध्ये मिळणाऱ्या विविध सुविधा
या अभियानांतर्गत प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वितरण, विविध दाखले देणे, अकृषक (एनए) प्रकरणांबाबत मार्गदर्शन, ‘सनद’ प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले, तुकडेबंदी कायद्यांतर्गत प्रकरणांचा निपटारा, घरकुल पट्टेवाटप, ई-मोजणी अर्ज निकाली काढणे, अॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी तसेच गाव दप्तर अद्ययावत करणे आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संबंधित तारखांना आपल्या परिसरातील शिबिरात उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. ग्रामीण व नागरी भागातील विद्यार्थ्यांनीही आवश्यक दाखले शिबिरांमधून प्राप्त करून घ्यावेत, असेही त्यांनी नमूद केले.
वार्तालाप परिषदेत अधिकारी,कर्मचारी, पत्रकार, समाजमाध्यम प्रभावक सहभागी होते.
0 Response to "जिल्ह्यात १५ मेपर्यंत ‘महाराजस्व समाधान’ शिबिरे; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे"
Post a Comment