-->

जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्वच्छता सप्ताह’  ग्राम स्वच्छता महिला मंडळाचा  उपक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्वच्छता सप्ताह’ ग्राम स्वच्छता महिला मंडळाचा उपक्रम



साप्ताहिक सागर आदित्य 

जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्वच्छता सप्ताह’

ग्राम स्वच्छता महिला मंडळाचा  उपक्रम


वाशिम 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाशिम जिल्ह्यातील भूली (तालुका मानोरा) या गावातील ग्राम स्वच्छता महिला मंडळातील सुमारे 50 महिलांच्या वतीने जिल्ह्यात स्वच्छता सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताह अंतर्गत त्यांनी बुधवारी (दि.५) येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद परिसराची स्वच्छता केली.

यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी योगेश क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत करून या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.

ग्रामस्वच्छता महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १ ते ८ मार्च दरम्यान "स्वच्छता सप्ताह" राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानास १ मार्च रोजी तीर्थक्षेत्र धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज संस्थान परिसरातून उत्साहात प्रारंभ करण्यात आला.


भुली ग्राम पंचायतीच्या पोलिस पाटील तथा ग्रामस्वच्छता महिला मंडळाच्या अध्यक्षा छाया अरुण डहाके यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी यात्रेनिमित्त परिसरात साचलेला कचरा हटवून स्वच्छतेचा संदेश दिला. महिलांनी स्वतः झाडू हाती घेत स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारत सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले. स्वच्छता सप्ताहांतर्गत भुली गावासह विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. २ मार्च रोजी होळी सणानिमित्त सावरगाव (कान्होबा) यात्रा स्थळी सुमारे दोन एकर परिसर स्वच्छ करून या ‍महिलांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश क्षिरसागर यांच्या हस्ते महिलांना माँ जिजाऊ यांची प्रतिमा भेट देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे, जिल्हा परिषदेचे लेखा अधिकारी सु. ब. जाधव, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, जल जीवन मिशनचे शंकर आंबेकर, राम श्रृंगारे, अभय तायडे, समाधान खरात यांची उपस्थिती होती.

------------

0 Response to "जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्वच्छता सप्ताह’ ग्राम स्वच्छता महिला मंडळाचा उपक्रम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article