-->

शेलगाव राजगुरे येथे RPI ची कार्यकारणी गठीत व सभा संपन्न.....

शेलगाव राजगुरे येथे RPI ची कार्यकारणी गठीत व सभा संपन्न.....



 साप्ताहिक सागर आदित्य 

शेलगाव राजगुरे येथे RPI ची कार्यकारणी गठीत व सभा संपन्न..... 

        

       रिसोड तालुक्यातील शेलगाव राजगुरे येथे  RPI खोब्रागडे या पक्षाची बेठक पार पडली. प्रथमतःमहापुरुषांची दीप धूपाने करण्यात आले .त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष  कैलास हिरवाळे  यांनी पक्ष बांधनी करिता मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच वाशिम जिल्हा प्रभारी  नितीन खिल्लारे यांच्या उपस्थिती मध्ये वाशिम जिल्हा कार्यकारणी चे पद वाटप करण्यात आले. वाशिम जिल्हा अध्यक्ष स्थानी  अंकुश श्रावण सोनुने यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा सचिव  राजरतन भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष विकास कळंबे, जिल्हा युवा अध्यक्ष वाशीम विकास खंडारे, जिल्हा  युवा उपाध्यक्ष     त्रिशरण मोरे, जिल्हा युवा उपाध्यक्ष राहुल जाधव, तर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष वाशीम जिल्हा सौं. पल्लवी राजरतन भालेराव,  ओंकार विठोबा खंडारे तालुका अध्यक्ष (कलावंत ) हे होते.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. संजय भालेराव व आभार प्रदर्शन अंकुश जी. सोनवणे यांनी केले.

0 Response to "शेलगाव राजगुरे येथे RPI ची कार्यकारणी गठीत व सभा संपन्न..... "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article