-->

वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे दहावी विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ संपन्न

वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे दहावी विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ संपन्न

 


साप्ताहिक सागर आदित्य 

 वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे दहावी विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ संपन्न

वसंतराव नाईक विद्यालय. मानोरा येथे आज दिनांक १४ फेब्रुवारी २०२६, शनिवार रोजी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यामुळे कार्यक्रमाला प्रेरणादायी वातावरण लाभले.


आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय प्रसेन भगत सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अक्षय भगत सर व शिव मार्गे सर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

यानंतर वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. मनोगत व्यक्त करताना काही विद्यार्थी-विद्यार्थिनी भावनिक झाल्या. त्यांनी शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेतील स्नेहबंध आणि मिळालेल्या संस्कारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

शाळेतील सर्व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आगामी माध्यमिक शालांत परीक्षेसाठी परिश्रमपूर्वक तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात प्रसेन भगत सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “जीवनातील प्रत्येक परीक्षा ही एक लढाई आहे. या लढाईला आत्मविश्वासाने व जिद्दीने सामोरे जा, यश निश्चित तुमचेच असेल.” असे आवाहन केले. व येणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन इयत्ता ९ वी च्या कु. प्रिया चव्हाण, कु. मीनाक्षी धट व  भाग्यश्री देवकर,वैष्णवी वारे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. ज्ञानदीपाली धट व संचिता राठोड यांनी उत्तमरीत्या केले.

यावेळी शाळेतील शिक्षक वानखडे सर, सतीश भगत सर, जयस्वाल सर, राठोड सर, उजवे सर, भालेराव मॅडम, चातुरकर मॅडम, इंगोले मॅडम, सरनाईक मॅडम, अक्षय सर, मार्गे सर, मोहसीन सर, तायडे सर, पारधी सर तसेच शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे दहावी विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ संपन्न"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article