-->

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री. संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज व माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री. संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज व माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक



 साप्ताहिक सागर आदित्य 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री. संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज व माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक 


वाशिम,   श्री. संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.(१४) रोजी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे भेट देत संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज तसेच माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.


यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड,आमदार धर्मगुरु बाबु सिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज,महंत शेखर महाराज,महंत सुनील महाराज, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आदींची प्रमुख उपस्थिती होती.


या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतांच्या विचारांचा समाज घडविण्यात मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. सत्य, अहिंसा, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश संत सेवालाल महाराज व संत रामराव बापू महाराज यांनी दिला असून, त्यांच्या विचारांवर चालत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

पोहरादेवी हे केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पायाभूत सुविधा, रस्ते, निवास व्यवस्था व भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले केले.

कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक, समाजबांधव व मान्यवर उपस्थित होते. संतांच्या चरणी नतमस्तक होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात शांतता, सामाजिक सलोखा व सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.

यावेळी महंत, विश्वस्त व ट्रस्टी देखील उपस्थित होते.

0 Response to "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री. संत सेवालाल महाराज, संत शिरोमणी रामराव बापू महाराज व माता जगदंबेच्या चरणी नतमस्तक "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article