वसंतराव नाईक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व साजरी करण्यात आली.
साप्ताहिक सागर आदित्य
मानोरा,
वसंतराव नाईक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे कर्मचारी रामराव पाटील सर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणा केली.
यानंतर “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित” या विषयावर निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी आपल्या लेखनातून शिवरायांचे शौर्य, पराक्रम, संघटन कौशल्य, स्वराज्य स्थापनेचे ध्येय व राष्ट्रनिष्ठा प्रभावी शब्दांत व्यक्त केली.
या प्रसंगी वानखेडे सर, सतीश भगत सर, भालेराव मॅडम, चातुरकर मॅडम, इंगळे मॅडम, राठोड सर, अक्षय सर, मार्गे सर, मोहसीन सर व पारधी भाऊ आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या आदर्शांचे पालन करण्याचे व देशभक्तीची भावना जोपासण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिवरायांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी जीवनात प्रामाणिकपणा, धैर्य व स्वाभिमान जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व साजरी करण्यात आली."
Post a Comment