वाशिम जिल्ह्यातील मनोज वानखेडे यांची विभागीय अध्यक्षपदी तसेच विवेक भुयार यांची सचिवपदी निवड
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्ह्यातील मनोज वानखेडे यांची विभागीय अध्यक्षपदी तसेच विवेक भुयार यांची सचिवपदी निवड
शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दि. कर्मचारी व अधिकारी संघटना मुंबई-32 यांची राज्यस्तरीय सभा दि. 22/02/2026 रोजी नाशिक येथे आयुक्त कार्यालय, संघटना कार्यालय, नाशिक रोड येथे पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान राज्य अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सचिव राजेंद्र आंधळे उपस्थित होते.
राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघटना बळकटीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीत राज्यस्तरीय निवडपत्र व जिल्हाध्यक्ष निवडपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी वाशिम जिल्ह्यातील मनोज वानखेडे यांची अमरावती विभागीय अध्यक्षपदी तसेच विवेक भुयार यांची अमरावती विभागीय सचिवपदी निवड जाहीर करण्यात आली. या निवडीबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सभेत दिव्यांग UDID कार्ड पडताळणी, TET परीक्षा, दिव्यांग बिंदूनामावली व पदोन्नती आरक्षण, दिव्यांग मंत्रालय सचिवांसोबत बैठक आयोजित करणे तसेच राज्य अधिवेशनाचे आयोजन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दिव्यांग कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायकारक बाबींविरुद्ध राज्य संघटना ठामपणे पाठपुरावा करेल, असे आश्वासन देण्यात आले.
यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांतील जिल्हा व राज्य पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. विविध पदांवर नियुक्ती झालेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सभेत मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
0 Response to "वाशिम जिल्ह्यातील मनोज वानखेडे यांची विभागीय अध्यक्षपदी तसेच विवेक भुयार यांची सचिवपदी निवड"
Post a Comment