-->

 भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आठवणी, कृतज्ञता आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छांसह भावपूर्ण निरोप सोहळा संपन्न....

भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आठवणी, कृतज्ञता आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छांसह भावपूर्ण निरोप सोहळा संपन्न....



साप्ताहिक सागर आदित्य 

 भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आठवणी, कृतज्ञता आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छांसह भावपूर्ण निरोप सोहळा संपन्न....                           .                      

रिसोड तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील एकमेव भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींनी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना सस्नेह निरोप दिला. निरोप समारंभाच्या अध्यक्षा  प्राचार्या मंजुषा सु.देशमुख मॅडम, पर्यवेक्षक सुनील डाहळके सर, ज्येष्ठ क्रीडा सुधीर देशमुख सर, वर्ग बारावीचे वर्गशिक्षक प्रा.पी.एच. मोरे , अभिषेक टिकाईत,प्रा.चंद्रशेखर हिरे व इयत्ता अकरावीचे वर्गशिक्षक प्रा.गुलाब  साबळे , प्रा. वृषाली देशमुख , प्रा.साधना बोरकर  यांच्या सह जवळपास 300 विद्यार्थिनींच्या उपस्थितीत भावपूर्ण,कृतज्ञतापूर्वक, सस्नेह निरोप समारंभ पार पडला. प्रथमतः   प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर कु.तृप्ती सदार हीने कार्यक्रमाचे उत्कृष्ट प्रास्ताविक केले. त्यानंतर  विद्यार्थिनींचे आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली. त्यामध्ये कु.किरण कैलास पवार, आरती दीपक साळवे, साक्षी गायकवाड, यशोदा लिंगे, अनन्या वाठोरे, अनुराधा पवार, पुजा जाधव, निकिता खोडके,सना पठाण, अनुष्का अवचार, सानिका खोडके, पुनम कांबळे, सिद्दी तायडे या विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या प्राचार्या,पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच हे महाविद्यालय आमच्या आयुष्यातला प्रगतीच्या वळणावरचा एक टप्पा कसे ठरले असे विचार आपल्या मनोगतपर भाषणातून व्यक्त केले. तदनंतर प्रा. पांडुरंग मोरे, प्रा. अभिषेक टीकाईत, प्रा. चंद्रशेखर हिरे, या बारावीच्या वर्ग शिक्षका व्यतिरिक्त प्रा. पंजाब पानझाडे, प्रा.गोपाल वाझुळकर, प्रा. ज्ञानेश्वर भुतेकर ,प्रा. विजयमाला आसनकर,प्रा. दीपिका पुंड, प्रा. विजया मिटकरी या सर्व शिक्षक- शिक्षकेनी आपले मार्गदर्शन पण मनोगतुन परीक्षेच्या काही टिप्स देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील डहाळके सर यांनी आपल्या मनोगतातून या महाविद्यालयात मिळालेली संस्कार हे तुम्हाला प्रत्येक वळणा वळणावर आयुष्यात कसे उपयोगी पडतील याची जाणीव करून दिली. शेवटी महाविद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा सु. देशमुख मॅडम यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुलींना शिक्षणाबरोबर संस्कार शील चारित्र्य हे खरे आयुष्यातील दागिने आहे. हे जपले तर आयुष्य नक्कीच सुंदर होईल असा सुचक सल्ला दिला. विद्यार्थिनी आणि शिक्षक आपले मनोगत व्यक्त करतात भाऊक झाले होते. या भावनिकतेच्या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी विनोदी प्रा. अभिषेक टिकाईत सर यांनी प्रश्नमंजुषा छोटेखानी कार्यक्रम घेऊन विद्यार्थिनींना स्वतः बक्षीसे दिली.या नंतर सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. या निरोप समारंभाचे बाहरदार सूत्रसंचालन कु. किरण सदार व सहनिवेदिका कु. प्रियंका ढोले यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु.पायल शिंदे हीने केले. कार्यक्रमाची सांगता फोटोसेशन ने करण्यात आली. व शेवटी जड अंतकरणाने विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचा निरोप घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे दादा रवी कुतमारे, सोमेश्वर मखमले, संदीप कस्टे, विजय देशमुख यांनी खूप परिश्रम घेतले.

0 Response to " भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आठवणी, कृतज्ञता आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छांसह भावपूर्ण निरोप सोहळा संपन्न.... "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article