मुलीच्या लग्नात आई पेक्षा वडीलच जास्त अस्वस्थ होतात आणि बहिणीपेक्षा भाऊ जास्त
साप्ताहिक सागर आदित्य
चि. सौ. का. लाडकीस. अनेक गोड-गोड आशीर्वाद
मुलीच्या लग्नात आई पेक्षा वडीलच जास्त अस्वस्थ होतात आणि बहिणीपेक्षा भाऊ जास्त डिस्टर्ब होतो. कारण त्या मुलीशी खुप काही बोलायचं राहुन गेलेलं असतं! लालमनी जोडले काळे मणी जोडले तुझ्या हक्काच्या घरी जाण्यासाठी आज तू माहेर सुद्धा सोडले . क्षणात पारखी झालीस बालपनाला मागे ठेवून तू विवाहाच्या बोहल्यावर चढलीस सप्तपदींनी चतुर्भुज झालीस. अग्नि ब्राह्मणाच्या साक्षीनं तुझ्या जोडीदारांन वरमाला घातली. मंगलाष्टके झाली. अक्षता पडल्या जेवणावेळी उठल्या कन्यादान झालं आणि आता निरोपाची वेळ आली.
या निरोपाच्या प्रसंगी काय बोलावं ते कळत नाही. सूर जुळत नाही. शब्द मिळत नाही. पण हे निरोपाचे प्रसंग टाळून सुद्धा ठरत नागीत. व्यक्त करावंच लागतं. दाटलेल्या कंठाने लाडकीला निरोप द्यावाच लागतो. सर्वच भावना शब्दात व्यक्त करता येत नसतात. अशावेळी व्यक्त करण्याचं काम दागिने करतात. सोन्याचे दागिने का? हा तुझा प्रश्न अगं सोन्यासारखा जोडीदार मिळाला त्याचं ते प्रतीक सोन्यासारखा संसार होवो हा त्यामागून आशीर्वाद. तुम्ही मुली सोन्यासारख्याच असतात सर्वांना आकर्षण घेणाऱ्या, हव्या हव्याशा आणि संकटात मदतीला धावून येणाऱ्या सोन मुशीतून निघाल्यावरच उजळून जातं तसं संकटातूनच तुम्ही मुली अधिक तेजस्वी वाटतात. तुमचं स्वत्व सिद्ध करतात. काय म्हणतेस? कानात अनेक ठिकाणी टोचले त्याचा त्रास होतोय ना! अगं, मुली सासरी जातात म्हणून माहेरच्याच माणसांनी कान टोचायचे असतात, माहेरची माणसं कांन टोचत असतात आणि बाहेरची माणसं कान भरत असतात. कान टोचणे म्हणजे आईचा कानमंत्र असतो. वडिलांच्या गुजगोष्टी असतात. करा मग ऊन जाऊन तिखट होऊ नको हा संदेश असतो मनस्ताप देणाऱ्या गोष्टीकडे डोळे झाक नाही केली तरी चालेल तरी कानाडोळा आवश्य कर हे सांगणं असतं.
तुझ्या कानातले दागीने मुद्दाम जडच ठेवलेत. तू हलक्या कानाची नसावी हा त्या मागचा उद्देश, कानातले दागीने डोक्यातल्या कैसाना ओडलेले असतात. कारण काना इतकच डोक सुध्दा महत्याच. हे तुला सांगायचे आहे. म्हणून तुझ्या सासरच्या लोकांविषयी, पतीविषयी कोनी काही बोलल तर आधी शांत डोक्याने विचार कर. मगच निर्णय घे. ऐकलेल्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात ग ! तुझ्या नाकातली नथ छोटी त्यातला मोती त्याही पेक्षा छोटा, बेटा यातून तुला एक व्यवहार शिकवायचा ' नाका पेक्षा मोती जड नसावा 'बेटा बघ ना, आज तुझ्याशी पत्रातुन बोलतांना प्रथमच मी इतका भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे, नाही बेटा रडु नको, तुला रडण सहन होत नाही, तुझ डोक पटकन दुखत, एक गा पोरी तुझ्या गळ्यात सोन्यामौत्याचा दोन सरी आहेत. पण या सर्वात महत्याच असतं. मणी मंगळसुत्र त्यातले काळे मणी, तुझ्या मॉर्डरीटीचं लक्षण आहे.
रंगीत मण्याचा खेळकर पणा संपला आणि कच्च्या मण्यातली परी पक्वता तुझ्यात आली हे दर्शवितात. काळे मणी तुझ्या संसाराला नरज लागू नये म्हणून तीट असलेले काळे मणी तू म्हणाली होती, गला एक डोर्ले हवय पण दोन वाट्या म्हणजे संततीचा आशीर्वाद आहे. तु फक्त मुलाची अथवा मुलीची आई होवू नये. तर मुलाची आणि मुलीची दोघांचीही आई होवो हीच इच्छा. मुलगी प्रथम सासरी जाते तेव्हा त्या वाटा उघड्या असतात. पण पाच दिवसंनी माहेरी येते तेव्हा आई त्या वाटा पालथ्या करते.
आई सांगत असते तुला जे मिळाल ते त्याचा देखावा करू नको. पतीशी वागताना लहाण्या सामोर सयंम व मोठ्या समोर मर्यादा पाळ लज्जा हा सुध्दा स्त्रीचा एक दागीनाच ना! तुझ्या अनामिकतेतली अंगठी हे सांगते की, तु आता अनामिका झालेली आहे. तुझी ओळख बाजुला ठेवुन इतरांची ओळख जपायची आहे. तु चांगली वागलीस तर सासरच नांव निघेल आणि वाईट वागलीस तर माहेरच्या लोकांना नांवे ठेवली जातिल. तात्पर्य तु अनामिका आहेत.
तुझ्या हातात सोन्याचा बांगड्यासोबत काचेच्या हिरव्या बागड्या आहेत. हिरवा चुडा म्हणजे ताजेपणा, समृध्दी, बरकत यासाठी माहेरचा आशीर्वाद आहे. तुझ्या हाताने शिजवलेल अन्न कधीच कमी पडनार नाही. तु खऱ्या अर्थाने अनदा-धनदा ठरावी हा आशीर्वाद त्या बांगडांमधून देण्याचा प्रयत्न.
सोन्याच्या बांगड्या केव्हातरी साथ देतात. पण काचेच्या बांगड्या सदैव सोबत असतात. जपायच असत काचेच्या बांगड्यांना कारण
काचेच फुटणच जास्त अशुभ असतं. बांगडीच असणं म्हणजे. सौभाग्याच लक्षण असतं नां !
तुझ्या संसाराच्या यशासाठी कठीबध्द रहा हे सुचवतोय कमरेचा मेखला आणि छत्ला तुझ्या कर्तुत्वातून घराच मांगल्य राख तुझ्या जोडव्याचा आवाज, पैंजनाची रून-झुण, कंकणांची किणकिण घरामध्ये चैतन्य निर्माण करीन. नववधु बनुन तु उंबरठ्चावरचं माप ओलांडशील मापातले दाने सांडतील त्या वेळेस तुझ्या मनाच्या मापातील स्वप्नांचे मोती या घरात पसरून जातील.
बेटा या दागीन्यासोबत दिलाय कुंकवाचा करंडा यातील कुंकु खुप महत्वाच अग कुंकु आहे म्हणून दागीन्याला अर्थ आहे अन्यथा तुझा शृंगार व्यर्थ आहे. कुंकवाला जप त्याची चॉईस सांभाळ, दोघांमध्ये सुसंवाद आसु दे सणावाराला, लग्ग्राकार्यात, जयंती ला वटसावीत्रीला दागिने घालुन मिरव सुद्दा, मंगल प्रसंगी दागिन्यांच पुजन कर दागिण्यांची हौस असु दे पण हव्यास नसु दे. बेटा देव न करो आलचं एखाद संकट तुझ्यावर, तुझ्या कुटुंबियावर, तुझ्या पतीवर तर हसत, हसत या सर्व दागिण्याचा त्याग सुध्दा कर. कारण दागिण्या पेक्षा दागिण्यातला देह महत्वाचा त्या देहातल मन जास्त महत्वाचं आणि मनातली माणसं लाख मोलाची. एक मनस्वी पित्याचा त्याच्या लाडकीस हा दागिन्यातला आशीर्वाद !
जा मुली जा दिल्या घरी सुखी रहा, जा सुखी भव्.........!
शब्दांकन
तुझे बाबा/आई/भाऊ प्रा.गुलाब चतुरामाई श्रीपत साबळे. भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड. भ्रमणध्वनी. ९९२२३००६८०
0 Response to "मुलीच्या लग्नात आई पेक्षा वडीलच जास्त अस्वस्थ होतात आणि बहिणीपेक्षा भाऊ जास्त "
Post a Comment