-->

भा.मा. कन्या शाळेच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींचा निरोप समारंभ संपन्न.

भा.मा. कन्या शाळेच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींचा निरोप समारंभ संपन्न.



साप्ताहिक सागर आदित्य 

 भा.मा. कन्या शाळेच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींचा निरोप समारंभ संपन्न.

          रिसोड तालुक्यातील एकमेव मुलींची भा.मा कन्या शाळा असून. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी इयत्ता दहावीच्या जवळपास 250 विद्यार्थिनींना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभाच्या अध्यक्ष प्राचार्या  मंजुषा सु. देशमुख मॅडम, प्रमुख अतिथी पर्यवेक्षक  सुनील डहाळके सर, जेष्ट क्रीडाशिक्षक सुधीर देशमुख सर, जेष्ट शिक्षक सचिन महाजन सर, 10वी च्या वर्ग शिक्षिका निर्मला देशमुख मॅडम, स्मिता चव्हाण मॅडम या  प्रमुख उपस्थिती कार्यक्रम पार पडला असता. सुरुवातीला प्रतिमा पुजनानंतर प्रथमतः विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात गीत गायन केले त्यामध्ये आरती गायकवाड, प्रशंसा साळवे , किरण कोरडे, संस्कृती पावडे. तसेच मनोगतामध्ये वैशाली जामकर, रूपाली खोडके, अंकिता ढवळे, रिद्धी पुंड, साक्षी खडसे, पुनम वायभासे, अर्पिता लोखंडे, साक्षी गिरी, कृष्णाली सरकटे इत्यादी विद्यार्थ्यांनीनीं आपले मनोगत व्यक्त केले. प्राध्यापिका माजी नगराध्यक्ष विजयमाला आसनकर मॅडम, व ज्येष्ठ शिक्षक सुधीर देशमुख सर, दहावीच्या वर्ग शिक्षिका स्मिता चव्हाण मॅडम, ज्येष्ठ शिक्षक सचिन महाजन सर, निर्मला देशमुख मॅडम या सर्वांनी 10 च्या परीक्षेविषयी महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन केले. तसेच पालकांमधून  खरबळ  पंचायत समिती रिसोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेचे खूप खूप कौतुक केले.प्रमुख अतिथी पर्यवेक्षक  सुनील डहाळके सर यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना आयुष्यातल्या बोर्डाच्या पहिल्या परीक्षेला संत शुभेच्छा देत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या व शेवटी शुभेच्छा दिल्या.शेवटी अध्यक्षीय समारोपातून  प्राचार्या मंजुषा सु देशमुख मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून विद्यार्थिनींना आवाहन केले की आपणाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचे त्याचबरोबर स्वतःचे आणि आई-वडिलांचे नाव सुद्धा आपणाला कमवायचे आहे आपली एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. असे सूचक विधान करत दहावीच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स देत खूप खूप शुभेच्छा दिल्या. विशेष करून या कार्यक्रमाला पाल्यांसोबत पालकांना सुद्धा निमंत्रण देऊन बोलवण्यात आले आणि त्यांच्यासाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पालकांनी या शाळेच्या आदरातीथ्याबद्दल कौतुक केले व आभार व्यक्त केले.

 या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कु.शिवानी सरकटे व आभार प्रदर्शन कु. शिवानी सरकटे हिने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनीनीं मोलाचे योगदान दिले. व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

0 Response to "भा.मा. कन्या शाळेच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींचा निरोप समारंभ संपन्न."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article