-->

मानोरा- येथील वसंतराव नाईक विद्यालयात    मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

मानोरा- येथील वसंतराव नाईक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मानोरा- येथील वसंतराव नाईक विद्यालयात 

 मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रीशिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी मराठी भाषेच्या जतन व संवर्धनाची शपथ घेतली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक सतीश भगत सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक आदरणीय प्रसेन भगत सर यांनी मराठी भाषा दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. त्यांनी मराठी भाषेचा इतिहास, तिची साहित्यपरंपरा, संत-साहित्याचा वारसा तसेच आधुनिक काळातील मराठीचे योगदान यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन व्यवहारात शुद्ध मराठीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राठोड सर, अक्षय सर व मार्गे सर उपस्थित होते. त्यांनीही आपल्या मनोगतातून मराठी भाषेची समृद्धी, तिची अभिव्यक्तीची ताकद आणि सांस्कृतिक ओळख जपण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

या निमित्ताने वर्ग ७वी च्या मुलींनी मराठी गौरव गीत सादर केले .त्यानंतर इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भाषणे, कविता व मनोगते सादर केली. काही विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिकांच्या ओळी उद्धृत करत भाषेचा गौरव केला, तर काहींनी मराठीची जागतिक पातळीवरील ओळख अधोरेखित केली.

शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनीही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपले विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात सतीश भगत सर यांनी अत्यंत मार्मिक शब्दांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, “मातृभाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. तिचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”

कार्यक्रमाची सांगता “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” हे गीत शाळेचे शिक्षक मार्गे सर यांनी आपल्या सुरेल आवाजात हे गीत सादर करून संपूर्ण परिसर भारावून टाकला.

अशा प्रकारे मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वानखडे सर, मार्गे सर, राठोड सर, अक्षय सर, उजवे सर, मोहसीन सर, तायडे सर, जयस्वाल सर, शिक्षिका भालेराव मॅडम, चातुरकर मॅडम, इंगोले मॅडम, सरनाईक मॅडम, इंगळे मॅडम व पारधी भाऊ हे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी सोनोने, जानवी सोनोने यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. संचिता राठोड, कु. मीनाक्षी धट यांनी केले.

0 Response to "मानोरा- येथील वसंतराव नाईक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article