भारतीय स्टेट बँक ग्रामीण सेम रोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शिरपूटी येथे कृषीउद्दीने प्रशिक्षण संपन्न.....
साप्ताहिक सागर आदित्य
भारतीय स्टेट बँक ग्रामीण सेम रोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शिरपूटी येथे कृषीउद्दीने प्रशिक्षण संपन्न.....
भारतीय स्टेट बँक ग्रामीण प्रशिक्षण संस्था वाशिम च्या वतीने शिरपूटी येथे कृषी उद्यमी 13 दिवसीय प्रशिक्षण शिरपूर या ठिकाणी घेण्यात आले आहे. प्रशिक्षण दरम्यान एकूण 35 उमेदवार बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला होता.या प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे माती परीक्षण, बी,बियाणे कसे तयार करायचे,गांडूळ खत निर्मिती कशी करायची, दुग्ध व्यवसाय कसा करायचा किंवा स्वतःची तयारी कशी सुरु करायची किंवा शेळी पालन कशा पद्धतीने करायचे रासायनिक घेत शेती आणि सेंद्रिय शेती यामध्ये काय फरक आहे.सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी कसे वळले पाहिजे, घरच्या घरी कमी खर्चात शेती कशी केली पाहिजे. जास्तीत जास्त पीक उत्पादन करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे पीक आहेत जसे की खरीप आणि रब्बी पिकांमधला फरक काय आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक शेतकऱ्यांना समजून सांगितले प्रमुख मार्गदर्शक म्हणून गिरी सर होते.तसेच वनिता सुभाष साबळे मॅडम (व्याख्याता)SBI-RSETI Washim यांनी बँकिंग बद्दल तसेच उद्योजकीय सक्षमता कशा पद्धतीने व्यवसायिकांमध्ये असणे आवश्यक आहे.याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच उद्योजक आणि नोकरदार यामध्ये मुख्य फरक काय आहे. आणि उद्योजक उद्योजक कडे कसे वळले पाहिजे. याबद्दलचे सखोल मार्गदर्शन केले तसेच ग्रामीण रोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक आदरणीय बोईले सर यांनी प्रशिक्षणा दरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधेबद्दलचे मार्गदर्शन केले आहे. तसेच विमा बद्दल मार्गदर्शन केले आहे.प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना चहा,नाश्ता, जेवण तसेच वेगवेगळ्या प्रकारचे स्टेशनरी साहित्य वाटप करण्यात आले आहे.क्षेत्रभेट ही घेण्यात आली होती. प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा आणि तो लोन साठी किती उपयुक्त आहे याबद्दलची सखोल मार्गदर्शन वनिता सुभाष साबळे मॅडम यांनी दिली आहे SBI RSETI Washim ते संचालक यांनी बातमीअसे आवाहन केले की वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण वाशिम या ठिकाणी घेण्यात येतात जसे की मोबाईल रिपेरिंग व्हिडिओग्राफी मशीन क्लास ब्युटी पार्लर वस्त्र चित्रकला मोटर रिवायडींग अशा पद्धतीच्या प्रशिक्षणांना आपल्या आसपासचे जवळचे घरातले १८ ते ४५ वयोगटातले प्रशिक्षणार्थीना पाठवावेत असे आवाहन केले. संपर्क दूरध्वनी 90 22 85 45 52. या नंबर वर ग्रामीण भागातील गरजूवंत युवक युवतींनी लाभ घ्यावा.
0 Response to "भारतीय स्टेट बँक ग्रामीण सेम रोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शिरपूटी येथे कृषीउद्दीने प्रशिक्षण संपन्न..... "
Post a Comment