जिल्हा परिषद शाळा गोभणी येथे आनंद मेळावा संपन्न..
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषद शाळा गोभणी येथे आनंद मेळावा संपन्न.. ग्राम गोभणी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग 1 ते 4 या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून वेगवेगळी चाट,चविष्ट पदार्थ स्वतः तयार करून छोटी-छोटी दुकाने लावली. मुलांना शालेय जीवनाबरोबर व्यवहारिक व व्यावसायिक ज्ञान आणि व्यावसायिक मूल्याची रुजवणूक व्हावी.यासाठी या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या आनंद मेळाव्याचे उद्घाटन गोभणी गावचे माजी पोलीस पाटील तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था केनवडचे सचिव बबनराव गारडे पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच (माजी उपसरपंच) रणजीत साबळे पाटील, गावचे सरपंच सरोदे पाटील, डॉक्टर रोशन साबळे सर,पोस्ट मास्तर मांडवगडे साहेब, विष्णू जाधव, गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील दुर्गादास खोडवे, (माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष) नामदेव चव्हाण, (माजी सरपंच) संदिप घायाळ, शाळेतील शिक्षक वृंद मुख्याध्यापक महादेव वाढे सर, मोरे सर,बोरकर सर, चिद्रे सर, शालेय व्यवस्थापन समितीतील शिक्षण प्रेमी धनंजय साबळे, युवा मार्गदर्शक सदस्य गणेश राऊत, संतोष साबळे सोंगु हुले,उपाध्यक्ष शरद अंभोरे,सतीश काकडे व सर्व समस्त गावकरी उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे गावात सर्वत्र कौतुक होत असून या मेळाव्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या व स्वादिष्ट ग्रामीण मेव्यांची लय लुट केली.
0 Response to "जिल्हा परिषद शाळा गोभणी येथे आनंद मेळावा संपन्न.."
Post a Comment