महिलेवर बलात्कार अन् दगडाने ठेचून हत्या; मृतदेह वाशीमच्या रेल्वे स्टेशनजवळ फेकला
साप्ताहिक सागर आदित्य
महिलेवर बलात्कार अन् दगडाने ठेचून हत्या; मृतदेह वाशीमच्या रेल्वे स्टेशनजवळ फेकला
महिलेचे डोके मोठ्या
दगडाने ठेचलेले असल्याने हा हत्या प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला. तसेच मृतदेहावरील कपडे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळल्याने महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
जिल्ह्यातील रेल्वे स्थानक परिसरात आढळलेल्या अनोळखी
महिलेच्या निघृण हत्येचा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा
लावला असून या प्रकरणातील आरोपीला अकोला रेल्वे
स्थानकावरून अटक करण्यात आली आहे. या घटनेत
आरोपीने आधी बलात्कार करून नंतर महिलेची हत्या
केल्याची कबुली दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
आधी अत्याचार केले अन् नंतर दगडाने ठेचून हत्या
अधिकची माहिती अशी की, शुक्रवारी (दि.9) दुपारी वाशिम रेल्वे स्थानक परिसरात एका ट्रकजवळ महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस आणि रेल्वे पोलिसांची संयुक्त टीम घटनास्थळी दाखल झाली. मृतदेहाची पाहणी केली असता सदर महिलेचे वय अंदाजे 45 ते 50 वर्षांच्या दरम्यान असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
महिलेचे डोके मोठ्या दगडाने ठेचलेले असल्याने ही हत् झाल्याचे पोलिसांना लगेच समजले होते. त्यामुळे पोलिस तातडीने तपास सुरु केला होता. तसेच मृतदेहावरील कपडे अस्ताव्यस्त अवस्थेत आढळल्याने महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपासाच फिरवली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, सर्वप्रथम मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती घटनास्थळाजवळ वावरताना दिसून आली. पोलिसांनी त्या व्यक्तीचा माग काढत चौकशी केली असता तो अमरावती जिल्ह्यातील अडूळा बाजार गावातील असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे तात्काळ संबंधित गावात पोहोचले. मात्र तो संशयित गेल्या काही दिवसांपासून गावात नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याचा संभाव्य ठावठिकाणा लक्षात घेऊन पोलिसांनी अकोला रेल्वे स्थानकावर पाळत ठेवली. काल रात्रीपासून वाशिम शाखेचे पथक अकोल्यात तैनात होते.
आज सकाळच्या सुमारास सीसीटीव्हीमध्ये दिसलेला संशयित अकोला रेल्वे स्थानकावर आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव संतोष रामराव खंडारे असल्याचे सांगितले. सखोल चौकशीदरम्यान आरोपीने संबंधित महिलेसोबत आधी अत्याचार केले आणि नंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिली.
या घटचे
पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपीविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Response to "महिलेवर बलात्कार अन् दगडाने ठेचून हत्या; मृतदेह वाशीमच्या रेल्वे स्टेशनजवळ फेकला"
Post a Comment