-->

तालुक्यातील ग्राम पंचायत अधिकार्‍यांचा  सिईओ चौहान यांनी घेतला आढावा.

तालुक्यातील ग्राम पंचायत अधिकार्‍यांचा सिईओ चौहान यांनी घेतला आढावा.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

तालुक्यातील ग्राम पंचायत अधिकार्‍यांचा  सिईओ चौहान यांनी घेतला आढावा.


पंचायतराज अभियान, घरकुल आणि स्वच्छता विषयक कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे निर्देश.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांची कारंजा पंचायत समिती अंतर्गत  (दि. 8) आढावा सभा संपन्न झाली. येथील विद्याभारती महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री पंचायत राज अभियान, आवास योजना आणि  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध कामांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला.

बैठकीला जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील, गटविकास अधिकारी पुनम राणे आणि जिल्हा परिषदेचे सीबीएस प्रफुल्ल काळे यांची यावेळी उपस्थिती होती.

बैठकीमध्ये सुरुवातीला पंचायत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान, कर वसुली, पाच टक्के दिव्यांग खर्च, पी.एम. विश्वकर्मा योजना आणि प्रलंबित लेखा आक्षेप याबाबत सविस्तर आढावा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी घेतला.  यावेळी ग्रामपंचायतीची कर वसुली 50 ते 70 टक्केंपेक्षा कमी असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची सीईओ चौहान यांनी चांगलीच कान उघडली केली. नोव्हेंबर महिन्याच्या बैठकीपूर्वी वसुलीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले. कारंजा तालुक्याचे एकूण 13 हजार 478 लेखा आक्षेप प्रलंबित असून ते निकाली काढण्यासाठी 14, 15 आणि 16 ऑक्टोबरला 30- 30 ग्रामपंचायतीचे तीन विशेष कॅम्प घेण्याचे निर्देश सीईओ यांनी दिले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक धैर्यशील पाटील यांनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि मोदी आवास योजनांचा  सविस्तर आढावा घेतला. दिवाळीपूर्वी घरकुलाबाबतचे सर्व मस्टर काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचा निधी खर्च करा:

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे प्रलंबित आहेत. मधल्या काळात बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये निधी अभावी कामांना सुरुवात केली नव्हती. आता शासनामार्फत निधी प्राप्त झाला असून प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे व झालेल्या कामाचे देयक सादर करण्याचे निर्देश जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धैर्यशील पाटील यांनी यावेळी दिले. तालुक्यात वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाची कामे पूर्ण करून लाभार्थींना तात्काळ अनुदान वितरीत करण्याचे निर्देश दिले.

बैठकीला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी, उप अभियंता, घरकुलचे काम पाहणारे आर.एच.ई. आणि स्वच्छ भारत मिशनचे तालुकाचे समन्वयक यांची उपस्थिती  होती.

-----

0 Response to "तालुक्यातील ग्राम पंचायत अधिकार्‍यांचा सिईओ चौहान यांनी घेतला आढावा."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article