-->

रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी  आवश्यक उपाययोजना करा                              योगेश कुंभेजकर

रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा योगेश कुंभेजकर



साप्ताहिक सागर आदित्य 

 रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी

आवश्यक उपाययोजना करा                

            योगेश कुंभेजकर

जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समिती सभा संपन्न 


       वाशिम, दि. ९ ऑक्टोबर  : जिल्हयातून राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्ग जातात. या मार्गावरुन जाणारी वाहने भरधाव वेगाने मार्गक्रमण करतात. संबंधित विभागाने आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक बसविण्याची कार्यवाही करण्यासाठी घटनास्थळी भेट दयावी. गतीरोधक दर्शविणारे फलक लावून रस्त्यांवरील असलेले खड्डे बुजविण्याचे काम प्राधान्याने करावे. संबंधित यंत्रणांनी रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांनी दिले.

          जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची जिल्हास्तरीय समिती सभा दि.८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संग्राम जगताप, सह आयुक्त नगर प्रशासन बी.डी. बिकड, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष शेळके, 

          श्री. कुंभेजकर म्हणाले,  जिल्ह्यातील सिग्नल कार्यान्वीत राहतील याकडे नगरपालिका व वाहतूक शाखेने लक्ष दयावे. जिथे सिग्नल सेटअप उभा आहे . तिथे तरी  सिग्नल प्रणाली व्यवस्थित सुरू राहावी .रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहे ते तातडीने दुरुस्त करावे.  आवश्यक तिथे थर्मोप्लास्टिक पेंट‌ पार्कींग,कॅट्स आय,क्रॅश‌ बॅरीअर, गार्ड स्टोन, वेग मर्यादा सुचना फलक लावावे. रस्त्यांवरील पुलाला कठडे बसवणे तसेच खड्डे बुजविण्याची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी, ग्रामीण भागात  सिग्नल उभारणीसाठी स्थानिक यंत्रणांनी योग्य स्थाने आयडेंटीफाय करावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिले.


          जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी रस्त्यांची प्रस्तावित आणि सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करण्याचे तसेच मागील बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने संयुक्त पाहणी पथकाने केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेऊन तात्काळ कार्यवाहीचे निर्देशही यावेळी दिले.


बैठकीदरम्यान जिल्ह्यातील १०९ ब्लॅक स्पॉटवर झालेल्या कार्यवाहीचे परीक्षण करण्यात आले. तसेच सिग्नल उभारणीसाठी  यंत्रणांनी स्थानिक ठिकाणी जाऊन योग्य स्थाने आयडेंटीफाय करावीत, अशा सूचना दिल्या गेल्या.


प्रमुख रस्त्यांवरील अपघात प्रवण स्थळांवरील खड्डे, डागडुजी व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत आणि त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी साईट व्हिजिट करून इन्सपेक्शन रिपोर्ट सादर करण्याचे तसेच रोड बाऊन्स संदर्भात विभाग प्रमुखांचे प्रशिक्षण घेण्याचे निर्देशही देण्यात आले.


या बैठकीत मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी व नगरपालिका प्रशासनाने  स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.

रोड डिजिटायझेशन अंतर्गत "रोड बाऊन्स" डिजिटल रोड क्वालिटी सिस्टीमचे प्रात्यक्षिक सादर केले. जिल्हाधिकारी यांनी रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे सखोल विश्लेषण परिवहन विभागाच्या आय रॅड पोर्टलच्या माध्यमातून करण्याचे आणि कोणत्या रस्त्यावर अपघात झाला हे तात्काळ समजण्यासाठी आय रॅड पोर्टलमध्ये आवश्यक तो डेटा उपलब्ध व्हावा यासाठी समितीच्यावतीने शिफारस करावी असे निर्देश दिले.

          माहितीचे सादरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम जोशी यांनी केले. राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचे अपघात मृत्यू प्रमाण कमी असल्याचे त्यांनी सांगितले.

          यावेळी समितीशी संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

0 Response to "रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा योगेश कुंभेजकर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article