-->

सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजयराव कानडे यांचा ५६ वा वाढदिवस

सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजयराव कानडे यांचा ५६ वा वाढदिवस



 साप्ताहिक सागर आदित्य 

डॉ विजयराव कानडे  यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने होणार साजरा


वाशीम : वाशीम येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजयराव कानडे यांचा ५६ वा वाढदिवस रविवार दिनांक 15 /06/2025 रोजी कानडे इंटरनॅशनल स्कूल,शेलूबाजार रोड, वाशीम येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा होणार आहे.

 रक्तदानाचे महत्व लक्षात घेऊन

महात्मा फुले ब्लड डोनर ग्रुप ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन  करण्यात आले आहे. १०१ रक्तदात्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे.यासाठी शासकीय ब्लड बँक,जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम आणि डाळे ब्लड बँक यांचे सहकार्य मिळणार आहे.


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान २०२३- २४  टप्पा क्र.१ मध्ये कानडे इंटरनॅशनल स्कूल ला मिळालेल्या  बक्षीस रकमेतून २,६०,००० रुपये साऊंड सिस्टीम चे वाटप १९ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना वाटप करण्यात येणार आहे.या प्रसंगी वाशीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे  यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


 ५६ व्या वाढदिवसाच्या निमित्त ५६ वृक्षाचे रोपण करण्यात येणार आहे.तसेच रक्तदात्यांना वृक्ष वाटप करण्यात येणार आहेत.


दि.१५/०६/२०२५ रोजी कानडे बाल रुग्णालय,वाशीम येथे मोफत बाल रोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे.दिवसभर रुग्णाची मोफत तपासणी केली जाईल.


वरील उपक्रमांना सर्व स्तरातून प्रतिसाद मिळावा म्हणून आयोजक डॉ.कानडे  मित्र मंडळ,कानडे इंटरनॅशनल स्कूल,महात्मा फुले ब्लड डोनर ग्रुप,विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.बहुसंख्य नागरिकांनी वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या जनहित  उपक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

0 Response to "सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजयराव कानडे यांचा ५६ वा वाढदिवस "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article