
आईच्या सेवाधर्माचा वारसा पुढे नेणार निखील वानखडे अनुकंपा तत्त्वावर मिळाली अव्वल कारकून पदावर नियुक्ती
साप्ताहिक सागर आदित्य
आईच्या सेवाधर्माचा वारसा पुढे नेणार निखील वानखडे
अनुकंपा तत्त्वावर मिळाली अव्वल कारकून पदावर नियुक्ती
जीवनात काही प्रसंग असे येतात, जेव्हा संपूर्ण कुटुंबावर संकट कोसळते...वाशिमच्या सिव्हील लाईनमधील वानखडे कुटुंबावरही असेच संकट आले...
श्रीमती वैशाली वानखेडे ह्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अधिपरिचारीका या पदावर कार्यरत असताना त्यांचे निधन झाले.
निधनानंतर घरातील जबाबदारी एका क्षणात निखील आणि त्यांचे वडील रमेश वानखडे यांच्या खांद्यावर आली. पुढील वाटचाल कशी होईल, हीच चिंता वानखडे कुटुंबाला भेडसावत होती. कुटुंबाचा गाडा कसातरी पूढे जात होता.
घरातील आधारवड हरवल्याने संपूर्ण कुटुंब चिंतेत सापडले होते.१० वर्षं निघून गेली. अश्यातच वडीलांच्या सहाय्याने निखीलने बीकॉम पर्यंतच शिक्षण पूर्ण केले.अशाच कठीण प्रसंगी मुख्यमंत्री दीडशे दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती सर्वसमावेशक सुधारित धोरणानुसार शासनाच्या अनुकंपा नियुक्ती या तरतुदीने निखीलच्या जीवनाला नवी दिशा दिली.
आईच्या जागेवर नोकरीची संधी मिळाल्यानंतर निखील वानखडे अव्वल कारकून या पदावर रुजू होणार आहे.केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर समाजाचेही उत्तरदायित्व स्वीकारणार आहे. सुरुवातीच्या दिवसांत कर्तव्य पार पाडताना अनेक नवीन गोष्टी शिकाव्या लागणार, परंतु मेहनत, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव यांच्या जोरावर कामकाजाची गती लवकरच आत्मसात करणार हा विश्वास त्यांना या संधीतून मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज या नियुक्तीच्या माध्यमातून निखील वानखडे हे कुटुंबाच्या आधारस्तंभाप्रमाणे उभे राहणार आहेत. आईने जिथे सेवा थांबवली, तिथूनच त्यांच्या शासकीय कार्याचा धागा ते पुढे नेणार आहेत. शासनाने दिलेली ही संधी त्यांनी योग्य प्रकारे साधून कर्तव्यनिष्ठ कर्मचारी म्हणून स्वतःची छाप उमटवायला सुरुवात होणार आहे.
त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. संकटाच्या छायेतून उभारी घेत कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी घेतलेली झुंज म्हणजेच खरी यशोगाथा होय.निखीलने राज्यशासन व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.
जिल्हा माहिती कार्यालय
वाशिम
0 Response to "आईच्या सेवाधर्माचा वारसा पुढे नेणार निखील वानखडे अनुकंपा तत्त्वावर मिळाली अव्वल कारकून पदावर नियुक्ती "
Post a Comment