नामदेव सखाराम चव्हाण यांनी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्लिश पुस्तकांचे केले वाटप.....
साप्ताहिक सागर आदित्य
नामदेव सखाराम चव्हाण यांनी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्लिश पुस्तकांचे केले वाटप.....
ग्राम गोभणी येथील येथील आदर्श कास्तकार तथा माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष- नामदेव सखाराम चव्हाण यांनी जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हासुरे इंग्लिश ग्रामर पुस्तकाचे मोफत वाटप केले. आपल्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची आवड निर्माण व्हावी यासाठी या पुस्तकांची निवड करण्यात आली.तसेच आदर्श उपक्रमशील मुख्याध्यापक महादेव मारोती वाढे सर यांनी यासाठी इंग्लिश विषयाला स्पेशल वेळ देण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी शाळेतील शिक्षक बोरकर सर, चिद्रे सर व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष -गणेश सोळंके, उपाध्यक्ष- शरद अंभोरे सदस्य -गणेश राऊत, संतोष साबळे , सोंगु हुले,ज्ञानेश्वर सारुके या सर्वांनी शाळेच्या व सर्व गावकऱ्यांच्या वतीने माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नामदेव सखाराम चव्हाण यांचे या स्तुत्य उपक्रमामुळे स्वागत करत आभार मानण्यात आले. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक महादेव वाडे सर यांनी असे आवाहन केले की प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी यांचा आदर्श घेत या स्तुत्य उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.
0 Response to "नामदेव सखाराम चव्हाण यांनी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्लिश पुस्तकांचे केले वाटप....."
Post a Comment