आरोग्य व उत्पन्न दोन्ही देणारे चिया पीक वाशिम येथे शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन
साप्ताहिक सागर आदित्य
आरोग्य व उत्पन्न दोन्ही देणारे चिया पीक
वाशिम येथे शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन
वाशिम, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रशिक्षण सभागृह, वाशिम येथे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने १३ नोव्हेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी चिया पीक लागवड तंत्रज्ञानावरील विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षणात अनिसा महाबळे, प्रकल्प संचालक आत्मा, वाशिम यांनी चिया पिकाच्या तीन वर्षांतील यशस्वी कामगिरीचा आढावा घेतला व शेतकऱ्यांना या पिकाची व्हिडिओ यशोगाथा दाखवली. त्यांनी चिया बियांचे पौष्टिक मूल्य, आहारातील महत्त्व व त्यापासून तयार होणारे पदार्थ याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांना चिया सरबत देऊन त्याचे आरोग्यदायी महत्त्वही पटवून दिले.
यानंतर अरिफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी चिया पिकाचे सर्व वैशिष्ट्य सांगून पेरणी ते मार्केटिंगपर्यंतची प्रक्रिया, तसेच त्यानंतर या पिकापासून तयार होणारे कंपोस्ट याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी चिया लागवडीत जैविक निविष्ठांचा वापर करून उत्पादन खर्च कसा कमी करता येतो व या पिकाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी यावर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाला मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
0 Response to " आरोग्य व उत्पन्न दोन्ही देणारे चिया पीक वाशिम येथे शेतकऱ्यांना विशेष प्रशिक्षणाद्वारे मार्गदर्शन "
Post a Comment