कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ मंडळाचे संयुक्त आयोजन
साप्ताहिक सागर आदित्य
कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ मंडळाचे संयुक्त आयोजन
वाशिम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम आणि जिल्हा विधिज्ञ मंडळ, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोकलगाव येथे दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या राज्य गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही. जी. चौखंडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम यांनी “बालकांचे अधिकार” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
ऍड. वैभव तिफने, उपाध्यक्ष, वकिल संघ, वाशिम यांनी “बाल-अनुकूल कायदेशीर सेवा योजना, नालसा – २०२४” याबाबत माहिती दिली. तसेच ऍड. परमेश्वर आ. शेळके, मुख्यन्यायरक्षक, वाशिम यांनी “पोक्सो कायदा” या महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला नारायणराव काळबांडे, अध्यक्ष, जिल्हा विधिज्ञ मंडळ, वाशिम यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. डी. डी. गुडदे, कोषाध्यक्ष, जिल्हा विधिज्ञ मंडळ, वाशिम यांनी केले. आभारप्रदर्शन संबंधित शाळेतील शिक्षकांनी केले.
या जनजागृती कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ मंडळाचे संयुक्त आयोजन"
Post a Comment